Home चंद्रपूर धक्कादायक :- दारू माफिया संजय तेलकुंटवार यांचा महिलेवर प्राणघातक हल्ला.

धक्कादायक :- दारू माफिया संजय तेलकुंटवार यांचा महिलेवर प्राणघातक हल्ला.

 

बेंबाळ पोलीस चौकीत आरोपींना पोलीस अधिकारी प्रशांत  ठवरे यांचे सरक्षण? केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल केला.

चंद्रपूर न्यूज नेटवर्क :-

चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय राजाश्रय मिळालेल्या अवैध दारू व्यवसायात चोर गुंडे बलात्कारी यांचे साम्राज्य निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाच्या हप्तेखोरीने लाचार झालेली पोलीस यंत्रणा सर्वसामान्य जनतेचे रक्षण करण्यास कुचकामी करीत असल्याचा गंभीर प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात राजरोसपणे सुरू आहे.
अशीच एक दुर्देवी घटना बेंबाळ पोलीस चौकी अंतर्गत घडली असून दारू माफिया संजय तेलकुंटवार यांचा त्याच्या अवैध दारूसाठा गावात खाली करताना रेणुका दिवाकर कडवलकर यांनी बघितले असता तू आम्ह्च्या कडे कां पाहत होती? या एका शूल्लक कारणासाठी दारू माफिया संजय तेलकुंटवार यांनी काठीने तिचे डोक्यावर व शरीरावर खुलेआम वार करून गंभीर जखमी केले. या घटनेची तक्रार बेंबाळ पोलीस चौकी मधे केली असता अगोदरच प्रशांत ठवरे नामक इँचार्ज हे आरोपी कडून अवैध दारूच्या व्यवसायात हप्ता वसुली करीत असल्याने त्यांनी चक्क आरोपीला पोलीस स्टेशन मधे बोलवून व त्याचा मानसन्मान करून घरी पाठवले व तक्रार करणाऱ्या महिलेला पोलीस स्टेशन मधे जाणीवपूर्वक बसवून तिला नाहक त्रास दिला असल्याने पोलीस चौकी अधिकारी प्रशांत ठवरे यांच्या विरोधात जणांक्रोश आहे.

आरोपी संजय तेलकुंटवार हे आपल्या गाडीतून दारूच्या पेट्या उतरवीताना तक्रार कर्त्या महिलेने बघितले होते ती वेळ सकाळी ५ वाजताची असल्याने तिला एकटी पाहुन दारु माफिया संजय तेलकुंटवार् यांनी काठीने डोक्यावर व शरीरावर वॉर केले. व पोलीस स्टेशन मधे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली पण पोलीस चौकीत रेणुका कडवलवार् यांनी तक्रार दिली असता आरोपींवर कारवाई करण्यापेक्षा उलट फिर्यादीला पोलीस चौकीत बसवून ठेऊन नाहक त्रास दिला ही बाब अतिशय गंभीर असून या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्वरित दखल घेवून कारवाई करणे आवश्यक आहे अन्यथा दारू माफियांची दादागिरी वाढेल व पोलिसांची लाचारी समोर येईल.

Previous articleग्रामसभेत हरदोला कोळसा खाण व्यवस्थापनाला गावकऱ्यांनी घेरले.सामाजिक नेते राजू मत्ते यांचा पुढाकार.
Next articleलक्षवेधी :- आमदार किशोर जोरगेवार यांचे राज्यपालांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावाला समर्थन? मग वीज दरवाढीचा विरोध का नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here