Home चंद्रपूर खळबळजनक ;- पतीने स्मार्टफोन विकत घेवून दिला नाही म्हणून विवाहित महिलेने गळफास...

खळबळजनक ;- पतीने स्मार्टफोन विकत घेवून दिला नाही म्हणून विवाहित महिलेने गळफास घेवून केली आत्महत्या.

 

आईच्या मातृत्वापासून पोरके झालेल्या ८ महिन्याचा व २ वर्षाच्या मुलांचा टाहो.

भूमिपुत्र न्यूज नेटवर्क :-

सध्या स्मार्टफोनच्या वेडापाई छोट्या मुलांसह म्हाताऱ्याना सुद्धा फॅड आहे. प्रत्येकांकडे काहीही नसो पण स्मार्टफोन असावा,अशी इच्छा असतेच. परंतु फोन घेण्याची इच्छा जर पूर्ण झाली नाही तर कुणी आपला जिव द्यावा ही कल्पना करता येईल का? पण ही घटना घडली आहे, घुग्घूस शहरात हिमाचल लाईन शास्त्रीनगरात एका विवाहितेने पतीने मोबाईलचा हट्ट पुरविला नाही म्हणून गळफास घेवून आत्महत्या केल्याची हद्रयद्रावक घटना काल मंगळवारी 16 मार्च ला उघडकीस आली आहे.

घूग्गूस येथील लक्ष्मी सुरेश कुम्मरी असे मृत विवाहितेचे नाव असून तिला असलेल्या 8 महिन्याचा व 2 वर्षाच्या दोन्ही मुलांना आईच्या मातृत्वापासून पोरके व्हावे लागले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.शहरातील हिमाचल लाईन शास्त्रीनगर परिसरात सुरेश कुम्मरी हे राहतात. त्यांचे पेंटिंगचे काम आहे. त्याच कामाच्या भरवश्यावर पत्नी लक्ष्मी, 8 महिणे आणि 2 वर्षाचा असे दोन मुलांचे पालनपोषण करीत आहेत. त्यांच्या मिळकतीवरच संसाराचा गाडा आणि परिवाराच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करीत आहेत दरम्यान पत्नी लक्ष्मीने काही दिवसांपासून पतीकडे आपल्याला मोबाईल घेऊन देण्याबाबत हट्ट धरला होता. परंतु सध्या पतीकडे पैसे नसल्याने त्याने पत्नीला थांबण्यास सांगितले होते. मात्र ती मोबाईलचा हट्ट बाळगून असल्याने शेवटचे दोन दिवस थांबण्यास सांगितले होते. दरम्यान आज पतीने तिला मोबाईल घेऊन देण्यासाठी तयार केली होती. परंतु आज मोबाईल घेण्यापूर्वीच पत्नीने आज मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घरीच गळफास घेवून आत्महत्या केली. पती घरी आल्यानंतर घटना त्याच्या लक्षात आली. लगेच त्यांनी पोलिसांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून मृतदेह ताब्यात घेतला.

दरम्यान पोलिसांनी सदर आत्महत्येबाबत चौकशी सुरू केली असता, धक्कादायक कारण पुढे आले. पतीने आपल्या बयानात मोबाईलसाठी पत्नीचा अट्टाहास होता. परंतु मोबाईल घेण्यासाठी पैसे उपलब्ध न झाल्याने वेळेवर घेऊन देता आले नाही. मात्र आज मंगळवारीच आपण तिला मोबाईल घेऊन देण्याची व्यवस्था केली होती. आपल्या कामाचे पैसे घेऊन आलो होतो, परंतु त्या अगोदरच तिने घरीच स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केल्याची कबुली पोलिसांत दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here