Home चंद्रपूर दुःखद :- पुण्य नगरी चिमूर चे तालुका प्रतिनिधी गणपतजी खोबरे यांचे दुःखद...

दुःखद :- पुण्य नगरी चिमूर चे तालुका प्रतिनिधी गणपतजी खोबरे यांचे दुःखद निधन.

 

पत्रकारिता क्षेत्रात उडाली खळबळ, एक सच्चा पत्रकार हरपला.

चिमूर प्रतिनिधी :-

पुण्य नगरी चिमूर चे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव गणपतजी खोबरे यांचे कोरोना मुळे आज पहाटे दुःखद निधन झाले. एक प्रामाणिक निर्भीड समाजसेवक, सच्चा पत्रकार आणि चिमूर तालुका पत्रकार संघाचा आधारवड असलेले गणपतजी खोबरे यांना कोरोनाची लागण झाली होती, त्या संदर्भात पुण्यनगरी चे जिल्हा प्रतिनिधी मंगेश खाटिक यांच्याशी त्यांचे काल फोनवर बोलणे झाले होते व ऑक्सीजन चा तुटवडा होत असल्यामुळे व आरोग्य प्रशासनाच्या अव्यवस्थे बद्दल बातमी घेण्यासाठी त्यांनी सांगितले होते. मात्र दिवस उजाडत नाही तोच त्यांचे निधन झाल्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे प्रदीर्घ काळ काम केलेले व चिमूर परिसरात अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत झटनारे गणपतजी खोबरे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून स्वतःला सिद्ध करीत पत्रकारिता केली, कुंभार समाजातील गरीब परिवारात आपली प्रतिभा त्यांनी दाखवून सामाजिक लढ्यात मोठे योगदान दिले मात्र त्यांच्या आकस्मिक दुःखद निधनाने त्यांच्या इष्टमित्रांसह आप्तस्वकीय आणि परिवार दुःख सागरात बुडाला आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच भूमिपूत्राची हाक समूहातर्फे प्रार्थना.

Previous articleधक्कादायक :- चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1171 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णवाढीसह 16 कोरोना बाधितांचा मृत्यू.
Next articleचिंताजनक :- भय इथले संपत नाही.चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 18 बाधितांचा मृत्यू?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here