Home चंद्रपूर धक्कादायक :- तब्बल आठ वर्ष लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण?

धक्कादायक :- तब्बल आठ वर्ष लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण?

 

प्रेम एकीसोबत आणि साखरपुडा दुसरी सोबत? प्रेमिका भडकली दुर्गापूर पोलीस स्टेशन मधे होणार गुन्हा दाखल?

प्रेमाचा पंचनामा :-

असं म्हटलंय जातं की “प्रेमाच्या गावात आणि बाराच्या भावात” कारण ज्यांनी प्रेम केल त्यांची लंका जाळली असा सूर समाजात उमटू लागतोय पण अगोदरच्या काळात प्रेम ही निखळ,निस्वार्थ आणि निष्कलंक असायचं आणि म्हणूनच म्हटल्या जायच की “प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे नाते” पण इथे तर प्रेम म्हणजे केवळ वासनांचा बाजार भरलेला आहे.आता सगळीकडे जणू सारखच आहे की काय हेच कळत नाही जसे कपडे बदलतात तसे प्रेमी प्रेमिका आपापले जोडीदार बदलतात त्यामुळे आपल्या संस्कृती आणि परंपरेवर मोठा आघात होतांना दिसत आहे.

असाच एक प्रेमाचा खेळ खेळणाऱ्या राहुल कूचनकर यांनी आपल्या प्रेमिकेसोबत खेळला असून तब्बल आठ वर्ष ज्या मुलीसोबत प्रेमाचे नाटक करून व लग्नाचे आमिष देऊन लैंगिक शोषण केले त्या मुलीसोबत लग्नास नकार देऊन राहुल ने बल्लारपूर येथील एका मुलीसोबत साखरपुडा केल्याचा प्रकार जेंव्हा प्रेमिकेला माहीत झालाय तेव्हां ती रनरागीनी बनून सरळ दुर्गापूर पोलीस स्टेशन पोहचली आणि सामाजिक कार्यकर्त्या सरिता मालू यांच्या मदतीने पोलीस स्टेशन मधे तक्रार दाखल केली आहे.

राहुल कूचनकर हा वेकोलि मधे नौकरीवर असून आठ वर्षाच्या प्रेमाला पायदळी तुडवून त्यांनी जो बल्लारपूर येथील मुलीशी साखरपुडा केला त्या मुलीला सुद्धा तो एक प्रकारे धोका देत असल्याने दुर्गापूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार स्वप्नील धुळे यांनी आक्रमक भूमिका घेवून आरोपी राहुल कूचनकर याच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याने आता एकीसोबत प्रेम आणि दुसरी सोबत साखरपुडा करणाऱ्या राहुल कूचनकर याला जेल ची हवा खायला मिळू शकते …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here