Home चंद्रपूर कोरोना चर्चा :- आमदार, खासदार, नगरसेवक फक्त जनतेला शुभेच्छा देण्यासाठी आणि कामाचे...

कोरोना चर्चा :- आमदार, खासदार, नगरसेवक फक्त जनतेला शुभेच्छा देण्यासाठी आणि कामाचे श्रेय लाटण्यासाठी असतात का?

 

“बेड देता का बेड” या आवाजाने अख्खे रुग्णालय फिरताना रुग्णांच्या नातेवाईकांचा टाहो.

लोकप्रतिनिधीनी मनसे नगरसेवक तात्या मोरे यांचा आदर्श घेण्याची गरज.

लक्षवेधी:-

भारतात कोरोना संक्रमनाची दुसरी लॉट भयंकर रूप धारण करून दररोज हजारोंच्या संख्येने जीव घेत आहे तर दुसरीकडे सत्तेच्या नादात राजकीय पक्षाच्या अस्तित्वाच्या निवडणुका यामधे पुन्हा भर टाकून जनतेमधे कोरोनाचा प्रलय निर्माण करीत आहे. अशातच आता वाढत असलेली कोरोना रुग्ण संख्या आणि आरोग्य यंत्रणेकडे असलेला सुविधांचा अभाव यामुळे कोरोना संक्रमित रुग्णांना आता सरकारी रुग्णालयासह खाजगी रुग्णालयात सुद्धा बेड मिळणे कठीण झाले असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा रूग्णालयाच्या डॉक्टरांकडे “बेड देता का बेड” असा टाहो फुटत आहे, मात्र लोकप्रतिनिधी आमदार खासदार आणि नगरसेवक हे बघ्यांची भूमिका घेऊन सरकार व आरोग्य यंत्रणेवर केवळ आरोप करून मोकळे होत आहे, मग हे लोकप्रतिनिधी केवळ जनतेला शुभेच्छा देण्यासाठी आणि केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठीच असतात का? असा प्रश्न पडतोय.

महाराष्ट्रात कोरोना थैमान घालत असतांना राज्याचे सत्ताधारी नेते केंद्र शासनाला जबाबदार धरताय तर विरोधी पक्षाची नेतेमंडळी हे राज्य सरकारला दोष देतय पण स्वतःच्या कर्तूत्वाने किंव्हा स्वतःच्या बळावर एक हॉस्पिटल तयार करण्यास कुणी लोकप्रतिनिधी समोर येतांना दिसत नाही ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. एकीकडे लोकप्रतिनिधी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत असतांना दुसरीकडे मनसेचे पुणे महानगरपालिकेतील नगरसेवक तात्या मोरे यांनी मात्र जगावेगळ कार्य करून तरी “इच्छा तेथे मार्ग” हा मुलमंत्र जपला आणि पुणे, कात्रज येथे साई स्नेह हॉस्पिटलच्या मदतीने पुणे येथे एका हॉटेलच्या हॉल मध्ये ४० बेड ऑक्सिजन व ४० बेड होम आयसोलेशन हॉस्पिटल सुरू केले आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा ? याचा आदर्श घालून देणाऱ्या मनसे नगरसेवक तात्या मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन होतं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना ची स्थिती अत्यंत बिकट असून दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा व मृतांचा आकडा वाढत असतांना लोकप्रतिनिधी मात्र जिल्हा तालुका प्रशासन व आरोग्य यंत्रणेला सल्ले देत आहे पण संकटाच्या काळात एखाद कोविड सेंटर उभाराव किंव्हा आरोग्य चाचण्या संदर्भात स्वतःच्या खर्चाने मशनरीज आणून रुग्णांना दिलासा द्यावा अशी इच्छा दिसत नाही तर आजी माजी आमदार खासदार यांनी याबाबत जणू मौन धारण केले आहे याचे आश्चर्य वाटत आहे. केवळ एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून कोरोनाच्या काळातील या भयंकर परिस्थितीवर आपले लोकप्रतिनिधी नियंत्रण ठेवणार का? हा गंभीर प्रश्न असून जिथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतांना व आरोग्य यंत्रणेची आपले जणू अस्त्र शस्त्र म्यान केल्यागत परिस्थिती दिसत आहे अशा वेळी तरी चंद्रपूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपले सामाजिक दायित्व जपणारा की नाही याबद्दल शंका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here