Home वरोरा धक्कादायक :- नायब तहसीलदार अशोक सलामे यांचे कोरोना ने दुःखद निधन.

धक्कादायक :- नायब तहसीलदार अशोक सलामे यांचे कोरोना ने दुःखद निधन.

 

गोरगरिबांची कामे वेळेवर करणारे नायब तहसीलदार यांच्या निधनाने सर्वत्र स्मशान शांतता.

वरोरा प्रतिनिधी :-

या कोरोना च्या महामारीने कोण कुठे कसा आपल्याला सोडून जाईल याचा नेम नसून आपल्या तहसील कार्यालयातील कामकाजात सर्वसामान्य जनतेला कुठलाही त्रास न देता व कुठलीही पैशाची मागणी न करता त्यांची कामे वेळेवर काम करणारे नायब तहसीलदार अशोक सलामे यांचे आज कोरोना मुळे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून वरोरा येथे स्मशान शांतता पसरली आहे. एक कर्तबगार अधिकाऱ्याचा असा दुःखद अंत व्हावा ही गोष्ट मनाला चटका देऊन जाणारी आहे अशा प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

वरोरा तहसील कार्यालयात कार्यरत असणारे नायब तहसीलदार अशोक सलामे (वय 54 वर्षे)यांचा कोरोंनाने आज चंद्रपूर च्या खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले.अत्यंत प्रेमळ स्वभावाचे नायब तहसिलदार यांच्या कडे निवडणूक विभागाचे कार्य होते. त्याच्या पश्चात पती व तीन मुलं असा आप्तेस्वकीय आहे त्याचे चंद्रपूर ला राहते घर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here