Home धक्कादायक चिंताजनक :- हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात हे चाललंय तरी काय ?

चिंताजनक :- हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात हे चाललंय तरी काय ?

 

जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांचे धडाडीचे पाऊल मग स्थानिक प्रशासन झोपेत कसे?

हिंगणघाट प्रतिनिधी. प्रमोद जुमडे.

हिंगणघाट तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस कोरोना रोगांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतांना स्थानिक तहसील नगरपरिषद व आरोग्य प्रशासनाने यावर त्वरित उपयोजना राबवून कोरोना बाधिताना चांगली सुविधा निर्माण करून देणे आवश्यक आहे मात्र उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी बेजबाबदारीने वागत असल्याचे दिसून येत आहे.

अँटीजेन्ट्स टेस्ट व आरटीपीसीआर टेस्टसाठी लागलेल्या रांगेत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत असून तब्बल तीन विभागाचे कर्मचारी नेमके गेले तरी कुठे? हा प्रश्न निर्माण होतं आहे. जिल्ह्यात कोरोना च्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार धडाडीचे पाऊल उचलून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे. तर काही प्रशासनातील अधिकारी कर्मचारी त्यांची साथ देतांना दिसत नाही. हिंगणघाट शहरात दिड ते दोन लाख लोक संख्या असून सुद्धा उपजिल्हा रुग्णालयात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध  करून देण्यास इथले लोकप्रतिनिधी व राजकारणी कुचकामी ठरत आहे. फक्त हे नेते आणि लोकप्रतिनिधी पोस्टर बॅनरवर दिसतात पण जेंव्हा कोरोना सारख्या महामारी बिमारी च्या वेळेस तरी थोडा जनभावनेचा विचार करून काही सुविधा ह्या वेळेत त्यांच्याकडून उपलब्ध व्हायला पाहिजे, पण निगरगट्ट प्रशासन व झोपलेले राजकारणी यामुळे जनतेच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा गंभीर होतं चाललाय त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांचे होणारे हाल बघून इथे नेमके चालले तरी काय? असा प्रश्न पडतो आहे.

शहरातील उपजिल्हा रुग्णालय फक्त आणि फक्त नावाचे उप जिल्हा रुग्णालय ठरले आहे. येतील अधिकारांच्या निष्काळजीपणामुळे दवाखान्याची वाट लागली आहे. येतील असुविधेचा प्रभाव या प्रमाणात वाढला आहे की, येथे लोकांच्या जीवाशी खेळल्या जात आहे. येथील अस्वच्छता, जागो जागी कचऱ्याचे ढीगारे व दवाखान्याचा परिसरातील रस्त्याचे बेहाल आहे. येथील सोनोग्राफी मशीन चे उद्घाटन मोठ्या उत्साहात साजरे झाले होते. परंतु ती मशीन धूळ खात पडली आहे येथील ट्रामा सेंटर सुद्धा असेच आजारी अवस्थेत पडलेले आहे. दवाखान्यातील अधिक्षकाना ह्या बद्दल विचारल्यास त्यांचे उत्तर एकच असते, काय करावे वरून आम्हाला सहकार्यच मिळत नाही, येथे कर्मचाऱ्यांच्या जागा रिकाम्या आहे असे सांगण्यात येते. दवाखान्यात काही बाबतीत तर धक्कादायक प्रकार सुद्धा समोर आले आहे की ,ज्या चाचनी चे स्पेशालिस्ट दवाखान्यात उपलब्धच नाही तर मग त्या चाचणीची रिपोर्ट तयार होते कशी? वरिष्ठांनी वेळीच ह्या सारख्या बाबी वर लक्ष देणे गरजेचे आहे. नाही तर मोठ्या अनर्थ कोणीही टाळू शकणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here