Home भद्रावती शिंदे परीवाराचे कोविड काळातील कार्य पुण्याईचे – डॉ. अशोक जिवतोडे

शिंदे परीवाराचे कोविड काळातील कार्य पुण्याईचे – डॉ. अशोक जिवतोडे

 

आमदार खासदार यांना लाजवेल असे कार्य करणाऱ्या रवि शिंदे यांचा डॉ. अशोक जीवतोडे यांच्या हस्ते सत्कार.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात आमदार खासदार यांच्या पेक्षा शिंदे परीवाराचे कोविड-१९ च्या दुस-या लाटेच्या काळातील भद्रावती-वरोरा तालुक्यात सुरु असलेले मानवसेवेचे कार्य पुण्याईचे असून  जनसेवेत आपल्या कमाईतून खर्च करुन समाजाची सेवा करण्याचे महंत कार्य रवि शिंदे, डॉ. विवेक शिंदे यांच्या माध्यमातून होत आहे, असे गौरोवोदगार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, ओबीसी व विदर्भ चळवळीतील अग्रणी डॉ. अशोक जिवतोडे यांनी आज (दि.३) ला दि. चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवि शिंदे यांचा सत्कार करतांना काढले. व मी सदैव या कार्यात तुमच्या सोबत असल्याची ग्वाही दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, जनता शास.निम. सह. पतसंस्थेचे अध्यक्ष रवि देवाळकर आदी उपस्थित होते.

भद्रावती शिक्षण संस्था व शिंदे परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने भद्रावती शहरात कोविड-१९ च्या दुसर्‍या लाटेत निःशुल्क कोविड सेंटर सुरू करून तथा औषधी, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशीन, निःशुल्क भोजन, हेल्पलाईन, निशुल्क ओपीडी आदी सेवा सुरु आहेत. कोरोना काळात कोरोनाबाधितांकरीता बेड, प्लाज्मा, आदी त्यांनी मिळवून दिले. भद्रावती व वरोरा तालुक्यातील गावागावात मास्क, सॅनिटायजर वाटप केले. या सर्व कार्याची दखल घेवुन डॉ. अशोक जिवतोडे यांनी शिंदे परीवाराच्या कार्याचा गौरव केला व रवींद्र शिंदे यांचा सत्कार करून  जिल्ह्यात शिंदे परिवाराची नवी ओळख जिल्ह्याला झाली असल्याचे  त्यांनी म्हटले आहे

Previous articleखबरदार! अव्वाच्या सव्वा बील वसूल करणाऱ्या खाजगी रुग्णालयांवर कारवाई होणार?
Next articleधक्कादायक :- सरकारी कामात अडथळा व आपत्ती व्यवस्थापन कायदा मोडणाऱ्या नगराध्यक्ष अली वर अजूनही कारवाई का नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here