Home भद्रावती दुःखद :- बहुजन चळवळीतील एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड.

दुःखद :- बहुजन चळवळीतील एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड.

 

राजू मत्ते यांचे कोरोनाशी लढताना नागपूर येथे दुःखद निधन.

भद्रावती प्रतिनिधी :-

देशात कोरोना च्या संक्रमणामुळे लाखो नागरिकांचा जीव गेला त्यात अनेक डॉक्टर्स, नर्सेस, सामाजिक कार्यकर्ते, नेते, अभिनेते आणि साहित्तिक यांचा समावेश आहे. अशातच कोरोनाच्या लढाईत अनेकांनी विजय प्राप्त केला खरा पण बहुजन चळवळीतील जमिनी स्थरावर काम करणाऱ्या राजू मत्ते या योद्ध्यांला मात्र कोरोना पुढे विजय मिळविता आला नाही हे दुर्भाग्यच म्हणावे लागेल.

भद्रावती येथील कोंढा मधे अनेक पक्षाचा कार्यकर्ता ते वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा क्षेत्रात काम पाहणारे राजू मत्ते यांनी बहुजन चळवळीत सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्क अधिकारांसाठी अथक प्रयत्न चालवले ते मागील विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार होते पण त्यांनी वेळेवर आपली उमेदवारी जेष्ठ समाजसेवक रमेश राजूरकर यांना दिली पण कुठेही किन्तु परंतु त्यांनी येऊ दिला नाही. कर्नाटका एम्टा कंपनीत नौकरी करतांना कामगार कर्मचारी यांच्या हक्कासाठी ते लढले या परिसरातील प्रकल्पग्रस्त बेरोजगार युवकांना त्यांनी हक्काचा रोजगार मिळवून दिला.

यावर्षी ते कामगार चळवळीतून प्रकल्पग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी अग्रेसर होते व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कामगार विभागाचे ते नेत्रूत्व पण करणार होते पण मागील 20 मे च्या दरम्यान त्याना कोरोना ची लागण झाली आणि त्यांना नागपूर च्या अरिहंत हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले पण दुर्दैवाने त्यांच्या लंसवर प्रॉब्लेम आला आणि त्यांनी दिनांक ४ जून ला अखेरचा श्वास घेतला. राजू मत्ते यांच्या आकस्मिक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कारण घरचा कर्ता पुरुष तेच होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने भद्रावती तालुक्यातील एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड झाल्याने राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

Previous articleब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा अध्यादेश आजपासून झाला लागू.
Next articleआरोग्य वार्ता :- तिस-या लाटेसाठी ग्रामीण जनतेनी सतर्क व्हावे : रवींद्र शिंदे यांचे आवाहन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here