Home धक्कादायक धक्कादायक :- मूल तहसीलदार होळी यांची रेती व्यवसायिकांकडून कोट्यावधी ची वसुली?

धक्कादायक :- मूल तहसीलदार होळी यांची रेती व्यवसायिकांकडून कोट्यावधी ची वसुली?

 

माझं कोणी वाकडं करू शकत नसल्याचे तहसीलदार यांचे वादग्रस्त वक्तव्य? रेती व्यावसायिकांत दहशत?

पब्लिक पंचनामा भाग – १

जिल्ह्यात अवैध दारू विक्री नंतर अवैध रेतीचा विषय फारच गंभीर बनला आहे, कारण जिल्ह्यातील सर्व काम धंदे बंद असतांना अवैध दारू व अवैध रेती हे व्यवसाय राजरोसपणे सुरू होते, मात्र आता जिल्ह्यातील दारूबंदी हटली त्यामुळे शेकडो अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अंकुश लागला असून ते बेरोजगार होणार आहे पण अवैध रेती मात्र आताही जोरात सुरू आहे, अशातच अवैध रेती व्यवसायातून तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदार यांना मैनेज करून रेती माफियांनी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या महसूलाची चोरी केली आहे.

अवैध रेती वर अंकुश लावण्यासाठी प्रशासनाने रेती घाट लिलाव केले खरे पण रेती उपसा करताना जे नियम घालून दिले त्याचे सर्हासपणे उल्लंघन होत असल्याने त्याचा फायदा घेत तहसीलदारांचे मालसूतो अभियान सुरू आहे. त्यातच मूल तालुक्यात जवळपास १८ च्या आसपास रेती घाटाचे लिलाव झाले असून रेती उपसा जोरात सुरू आहे पण तहसीलदार यांच्या कडून या कायदा उल्लंघन करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवून लाखो रुपयाची अवैध वसुली त्यांच्या एका खास व्यक्तीकडून होत असल्याची खात्रीलायक माहिती असून त्यांनी रेती घाटात जेसीपी मशीन सुरू असल्याच्या नावाखाली प्रत्तेकाकडुन ७ लाख रुपयाची चालनच्या नावावर वसुली केल्याची सुद्धा चर्चा सुरू आहे.

तहसीलदार होळी यांना जणू मंत्रालय स्तरांवर वरिष्ठांच्या आशीर्वाद असल्याप्रमाणे ते चालेँज करताहेत की माझं कुणी काही वाकडं करू शकत नाही पण त्यांच्या मोबाईलवरून रेती व्यावसायिक व त्यांच्या खास वसुली अधिकारी व्यक्तीच्या झालेल्या संपूर्ण संभाषणाच्या कॉल डिटेल्स वरून ऑडियो रेकॉर्डिंगची कंपनीतून माहिती काढली तर त्यांनी अवैध मार्गाने किती वसुली केली व शासनाचा किती महसूल बुडवला याची माहिती समोर येणार आहे. त्यामुळे तहसीलदार होळी यांच्या कामकाजाची विभागीय चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.

Previous articleराजकीय कट्टा:- अनिल देशमुखांविरोधात भाजपचे सूडाचे राजकारण चाललंय?
Next articleईडीची परमबीर सिंगांवर मेहरनजर तर अनिल देशमुखांनाच त्रास का? परमबीर सिंग सुट्टीवर कसे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here