Home चंद्रपूर ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर येथे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधे झालेल्या गोळीबाराने उडाली खळबळ.

ब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर येथे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधे झालेल्या गोळीबाराने उडाली खळबळ.

 

अज्ञात इसमाने बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार यांच्यावर केला गोळीबार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारीत वाढ झाल्याची खळबळजनक घटना घडली असून चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मधे एका बुरखा बांधून आलेल्या अज्ञात इसमाने बल्लारपूर निवासी आकाश गंधेवार यांच्यावर केला गोळीबार यांच्यावर आज दुपारी 2ते 3 च्या दरम्यान गोळीबार केला आहे.

अचानक झालेल्या गोळीबारानंतर चंद्रपूर शहर पूर्णतः हादरून गेले आहे. गुन्हेगारी वाढत असल्याचे हे एक उदाहरण असून अवैध धंदे व त्यात असलेली स्पर्धा आणि आपसी देवाणघेवाण यातून हे गोळीबार होत असल्याचे दिसत आहे मात्र या प्रकरणी आता आकाश गंधेवार गंभीर जखमी असून त्यांच्या बयना नंतर खरे कारण काय हे स्पष्ट होणार आहे.या संदर्भात शहर पोलीस घटनेचा तपास  करीत असून आरोपीच्या शोधाशोध सुरू आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढत असलेली गुन्हेगारी आणि त्याला मिळत असलेले राजकीय सरक्षण यामुळे सर्वसामान्य जनता भयभीत झाली आहे. बल्लारपूर राजुरा वरोरा या शहरात अगोदरच वर्षात दोन दोन मर्डर व गोळीने खून झाले आता चंद्रपूर येथे झालेला गोळीबार अतिशय चिंताजनक असून पोलीस प्रशासनाने यावर आवर घालणे गरजेचे आहे.

Previous articleखळबळजनक :- प्रसिध्द ज्योतिषी रघुनाथ राजाराम येमुल यांना पोलिसांकडून अटक.
Next articleब्रेकिंग न्यूज :- चंद्रपूर येथे रघुवंशी कॉम्प्लेक्स मधे झालेल्या गोळीबाराने उडाली खळबळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here