Home चंद्रपूर डिजिटल मिडिया वेब पोर्टलच्या पत्रकारांची नियमबाह्य चौकशी करणे बंद करा.

डिजिटल मिडिया वेब पोर्टलच्या पत्रकारांची नियमबाह्य चौकशी करणे बंद करा.

 

जिल्हाधिकारी यांना डिजिटल मिडिया असोसिएशनचे निवेदन.संजय कन्नावार यांच्या मारहाण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जेव्हापासून वेब न्यूज पोर्टल सुरू झाले तेव्हापासून वर्तमानपत्राच्या पत्रकारांनी हे न्यूज पोर्टल बोगस आहे व अनधिकृत आहे त्यांना बातम्या देण्याचा कुठलाही अधिकार नाही अशा बोंबा ठोकल्या होत्या.पण त्यांना हे कळत नव्हते की ज्या दैनिक वर्तमानपत्रात ते नौकरी करतात त्या दैनिकांचे सुद्धा न्यूज पोर्टल चालतात मग ते न्यूज पोर्टल पण बोगस आणि बेकायदेशीर असावे, पण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून अशी यांची व्रुत्ती असल्याने केवळ स्थानिक न्यूज पोर्टलच्या बातम्यांवरच ते प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे जे अत्यंत चुकीचे आहे. कारण त्यांना हे सुद्धा माहीत नाही की केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रोद्धिगिकी मंत्रालयाच्या दिनांक 25 फरवरी 2021च्या अधिसूचना नुसार डिजिटल मिडिया अर्थात वेब पोर्टल व यू ट्यूब संदर्भात राजपत्र तयार करण्यात आले. त्यात डिजिटल पोर्टल व यू ट्यूब मधील बातम्यांसंदर्भात तक्रारी बाबत समाधान क्रियाविधी तयार करून यामधे प्रकाशक द्वारे प्रकाशित बातमी मधील मजकूर बाबत जर आक्षेप व तक्रार असेल तर अगोदर तक्रारकर्त्यानी प्रकाशकाकडे तक्रार द्यायला हवी असे निर्देशित आहे,

मागील काही दिवसापूर्वी पुष्कळशा न्यूज वेब पोर्टलवर एका बार आणि रेस्टॉरंट मधे एका पत्रकारांनी दुसऱ्याच्या टेबल वरील फ्रॉय चिकन चोरले व त्याला मारहाण झाल्यानंतर दुसरा पत्रकार पळाला अशा आशयाच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या बातम्यांमधे त्या बार रेस्टॉरंट मधे चिकन फ्रॉय चोरणा ऱ्या पत्रकारांची नावे प्रकाशित करण्यात आली नव्हती, पण काही पत्रकाराने याबाबत समोर येऊन ते आम्हीच आहो व  न्यूज पोर्टल मधील बातम्यांमुळे आम्हची बदनामी होत असल्याबाबतची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली व त्या तक्रारी च्या अनुषंगाने वेब न्यूज पोर्टल च्या काही पत्रकारांना घटना चंद्रपूर शहराची असताना देखील वरोरा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश पांडे यांच्याकडे खुलासा व बयाणा करिता बोलावण्यात आले होते जे नियमबाह्य असून न्यूज पोर्टल च्या संपादक, प्रकाशकावर अन्याय होत आहे, कारण पोलीस प्रशासनाला इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रोद्धिगिकी मंत्रालयाच्या दिनांक 25 फरवरी 2021च्या अधिसूचना संदर्भात कुठलिही माहिती नाही अशा प्रकारचे निवेदन काल डिजिटल मिडिया असोसिएशन च्या पदाधिकारी व सदस्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन याबाबत सविस्तर चर्चा केली व पोलीस प्रशासनाला नव्या डिजिटल मिडियाच्या कायदेविषयी कारवाई संदर्भात दिशानिर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली.

जवळपास पाच न्यूज पोर्टलसह पत्रकार संजय कन्नावार यांच्या चंद्रपूर क्रांती या वेब न्यूज पोर्टलवर त्या चिकन फ्रॉय चोर पत्रकारांची बातमी नाव न घेता प्रकाशित करण्यात आली होती. मात्र संबंधित निनावी पत्रकारांनी स्वताचे नाव पुढे करून व काही गुंडांना सुपारी देऊन संजय कन्नावार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या बाबतीत पोलिसांनी अजूनपर्यंत त्या गुंडावार व सुपारी देणाऱ्या पत्रकारांवर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला नाही, मात्र ज्या पोर्टल प्रकाशकांनी त्या पत्रकारांची नावे न टाकता बातमी प्रकाशित केली त्या प्रकाशकाची बेकायदेशीर चौकशी लावली व त्यांना मानसिक त्रास देणे सुरू आहे. त्यामुळे डिजिटल मिडिया असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन त्या चिकन चोर पत्रकारांची मारहाण प्रकरणी चौकशी करून त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढून यामागे कोण आहेत याचा छडा लावावा व दोषींची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी व डिजिटल मिडिया संदर्भात भारतीय राजपत्राचा अवमान पोलीस प्रशासनाकडून होत आहे तो थांबावंन्यासाठी दिशानिर्देश द्यावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेच्या लोक लेखा समितीचे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार. पोलीस महानिरीक्षक नागपूर यांना सुद्धा देण्यात आल्या. आता त्या चिकन चोर पत्रकारांची व संजय कन्नावार यांना मारहाण करणाऱ्या गुंडांवर पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण राजकीय व पत्रकारिता क्षेत्रातील मंडळीचे लक्ष लागून आहे.

Previous articleशैक्षणिक :- राज्यात शाळा महाविद्यालय कुठल्या आधारावर होणार सुरू.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान.
Next articleथरारक :- जम्मू-काश्मीरमधे भाजप नेत्यांच्या हत्त्या मागचे कारण थरारक?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here