Home चंद्रपूर शैक्षणिक :- राज्यात शाळा महाविद्यालय कुठल्या आधारावर होणार सुरू.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे...

शैक्षणिक :- राज्यात शाळा महाविद्यालय कुठल्या आधारावर होणार सुरू.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे मोठे विधान.

शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातला पुढचा निर्णय होणार?

शैक्षणिक वार्ता:-

सध्या राज्यातील कोरोना काळातील तिसऱ्या लाटेच्या संभावित धोक्या मुळे शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातला पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला. आता काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून आहे.

कॉलेज आणि शाळांच्या बाबतीत आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की, त्या दोन्ही विभागाने त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत असतील, वर्षा गायकवाड असतील. या दोघांशी माझी चर्चा झाली आहे. त्या दोघांचं म्हणणं आहे की, टास्क फोर्सचं म्हणणं महत्त्वाचं आहे. चार-पाच दिवसात टास्क फोर्सचे अहवाल येतील. संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतील.”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

१८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण झालेले नसताना त्यांना शाळेत बोलाविणे धोक्याचे असल्याची भूमिका घेत करोना बाबतच्या तज्ज्ञांच्या गटाने शाळा सुरू करण्यास विरोध दर्शविला होता.

 

Previous articleसमाजवादी पक्षाचे युवा नेते तनशील पठाण यांच्या वाढदिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन.
Next articleडिजिटल मिडिया वेब पोर्टलच्या पत्रकारांची नियमबाह्य चौकशी करणे बंद करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here