Home चंद्रपूर फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या महिला सदस्यांनी राबवला रक्षाबंधनचा उपक्रम.

फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या महिला सदस्यांनी राबवला रक्षाबंधनचा उपक्रम.

 

फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांचा पुढाकार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

मागील दोन वर्षापासून कोविड -१९ च्या कोरोना योद्धा म्हणून सतत जनसेवा करणाऱ्या फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांनी सामाजिक जाणीव ठेऊन जनतेच्या रक्षनार्थ सदैव सेवेत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून रक्षाबंधन कार्यक्रम राबवला आहे.
शहराच्या रामनगर पोलीस स्टेशन मधे जाऊन फ्रेंड्स चॅरिटी ग्रुप सदस्य महिलांनी रामनगर पोलीस स्टेशन मधे रक्षाबंधन कार्यक्रम साजरा केला. शिवाय शहराची वाहतूक सुरक्षा सांभाळणाऱ्या पोलिसांना देखील राख्या बांधून सर्वाना मिठाई भरविण्यात आली।यावेळी फ्रेंड्स चॅरिटी ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू यांच्यासह श्रुति कांबळे, सौ. मीनाक्षी करिये, कु. पूजा काळे इत्यादींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here