Home चंद्रपूर राजकीय कट्टा:- चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीला मोठा झटका,

राजकीय कट्टा:- चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टीला मोठा झटका,

 

चंद्रपूर जिल्हा संघटन मंत्री पदाचा राजेश बेले यांचा राजीनामा.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यात आम आदमी पार्टी चा असा कुठलाही प्रचलित नेता नसल्याने अडगळीत असलेला आम आदमी पक्ष पर्यावरण क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात मोठे नाव असलेले राजेश बेले यांच्या प्रवेशाने पक्षात नवचैतन्य आले होते व किमान चंद्रपूर शहरात आम आदमी पक्षाला ताकत मिळाली होती. शिवाय राजेश बेले हे ओबीसी समाजातील एक सर्वदूर ओळख असणारे पदाधिकारी असल्याने जिल्ह्यात पक्षाला मोठे बळ मिळाले होते पण पक्ष संघटन मजबूत नसताना सुद्धा आहे त्या पदाधिकाऱ्यांमधे आपसी रस्सीखेच असल्याने राजेश बेले यांना या पक्षातील आपसातील गुटबाजी सहन न झाल्यामुळे त्यांनी पक्षाच्या जिल्हा संघटन मंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याचे पत्र त्यांनी फेसबुक वर टाकल्याने जिल्ह्यात राजकीय खळबळ उडाली आहे.

राजेश बेले यांनी आपण चंद्रपूर वणी आर्णि लोकसभा निवडणूक लढणार असल्याची अगोदरच घोषणा केली होती व त्यांनी तसा कामाचा धडाका पण सुरू केला होता पण पक्षातील आपसी वादाला कंटाळून त्यांनी पक्षाचे पूर्व विदर्भ सचिव अविनाश श्रीराव यांच्याकडे राजीनामा पाठवून आम आदमी पार्टी ला शेवटचा रामराम केला असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here