Home राष्ट्रीय आनंदाची बातमी :- आता Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात...

आनंदाची बातमी :- आता Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात परत मिळतील पैसे?

 

कसे मिळतील पैसे परत हे जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी.

न्यूज नेटवर्क  :–

केवळ भारतातच नाही तर जगात सायबर गुन्हेगारांपासून सर्वसामान्य लोकांचा घामाचा पैसा कसा वाचवायचा हा गंभीर प्रश्न उभा असताना आता तो वाचवण्यासाठी एक सिस्टम उभारण्यात आली आहे. तिचा वापर करणे खुप सोपे आहे. ऑनलाइन होणारी फसवणूक कशी टाळावी आणि जरी पैशांची फसवणूक झाली तर 24 तासाच्या आत पैसे खात्यात कसे येतील ते समजून घेणे महत्वाचे आहे.

काय आहे हे सिस्टम?

भारत सरकारने सायबर क्राईम रोखण्यासाठी एक सिस्टम तयार केले असून त्यामधे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग नावाचे पोर्टल बनवले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर एक वेबसाइट बनवण्यात आली आहे. https://cybercrime.gov.in/Default.aspx या वेबसाइट लिंकवर एक हेल्पलाइन नंबर दिला आहे. तो नंबर 155260 आहे, तो सगळ्यानी नोंदवून ठेवणे गरजेचे आहे.तो क्रमांक आपल्या फोनबुकमध्ये सेव्ह करू शकतो.या पोर्टलवर दिल्ली, राजस्थान, उत्तराखंड, छत्तीसगढ, उत्तर प्रदेश, आसाम, तमिळनाडु आणि आंध्र प्रदेशचे लोक या नंबरवर सात दिवस कोणत्याही वेळी (दिवस-रात्र) कॉल करून आपली तक्रार नोंदवू शकतात. इतर राज्यातील लोक सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान फोन करून कम्प्लेंट करू शकतात.

या पोर्टलवर तक्रार करताना हे लक्षात ठेवा.

१) फ्रॉडची पूर्ण माहिती द्या.

२) फ्रॉडची अचूक वेळ सांगा.

३) बँकेचे नाव – पत्ता आणि ज्या बँक किंवा ई-वॉलेट मध्ये पैसे ट्रान्सफर झाले आहेत त्याची पूर्ण माहिती.

जर आपण अशा प्रकारची संपूर्ण माहिती दिली तर तुमच्या माहितीवर कारवाई होईल आणि पैसे लवकरात लवकर मिळतील. या वेब पोर्टलवर अर्थात वेबसाइटवर एक व्हर्च्युअल असिस्टंट म्हणजे मदतीसाठी संगणकीकृत मदतनीस सुद्धा असेल. त्याचे नाव सायबर दोस्त आहे. तुम्ही या मित्राच्या मदतीने सुद्धा तक्रार करू शकता.

कशी काम करेल ही सिस्टम?

जेव्हा तुम्ही 155260 वर कॉल कराल तेव्हा तो कॉल सायबर क्राईमच्या कॉल सेंटरमध्ये जाईल. तुमच्या फ्रॉडबाबत सर्व माहिती रेकॉर्ड केली जाईल. तुमच्या माहितीच्या आधारावर ज्या बँक खात्यात पैसे पोहचले असतील, सायबर क्राईम ते अकाऊंट फ्रीज करेल. तक्रार योग्य असेल तर गेलेले सर्व पैसे पुन्हा खात्यात येतील. पैसा परत टाकण्याची प्रक्रिया त्या बँकेकडून होईल, ज्यात पैसे ट्रान्सफर झाले आहेत.

पुन्हा एक प्रश्न काय आहे?

यामधे सायबर गुन्हेगारांनी फ्रॉडनंतर ताबडतोब पैसे काढले तर काय कराल? याबाबत सायबर क्राईमच्या दिल्ली शाखेने सांगितले की, या स्थितीत तुमची तक्रार तुमच्या हद्दीतील पोलीस ठाण्यात पाठवली जाईल. मग पोलीस इतर प्रकरणांप्रमाणे आरोपींना पकडून पुढील कारवाई करतील. पण हे लक्षात ठेवा सायबर क्राईमनंतर ताबडतोब 115260 वर कॉल करा, उशीर करू नका. बँक अकाऊंटच्या डिटेल कुणालाही देऊ नका. ओटीपी शेयर करू नका.
संशयास्पद कॉलरशी जास्तवेळ बोलू नका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here