Home चंद्रपूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांअंतर्गत बदल्या.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांअंतर्गत बदल्या.

 

कोण कुठल्या पोलीस स्टेशन मधे? वाचा सविस्तर बातमी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपपोलिस निरीक्षक यांच्या आंतरजिल्हा बदल्या नुकत्याच झाल्या असताना आता जिल्ह्याअंतर्गत विनंती बदल्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी नुकत्याच जाहीर केल्या असून ४८ तासात त्यांना नवीन बदलीच्या ठिकाणी पदभार सांभाळण्याचे आदेश दिले आहे.

घूग्गूस पोलीस स्टेशन मधे आपला अल्पशा कारभारानंतर मुख्यालयी बदली झालेले पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांची बदली गडचांदुर पोलीस स्टेशन मधे झाली असून गडचांदुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जी,वी,भारती यांची बदली भद्रावती पोलीस स्टेशन मधे झाली आहे. भद्रावती पोलीस स्टेशन चे ठाणेदार सुनिलसिंग पवार यांची पोलीस मुख्यालयी मानव संसाधन विभागात बदली झाली.पोलीस निरीक्षक आर एम शिंदे यांची चिमूर वरून विशेष शाखेत बदली करण्यात आली तर भिसी चे ठाणेदार गभणे यांची बदली चिमूर येथे करण्यात आली.प्रवीण कुमार पाटील यांची आर्थिक गुन्हे शाखेतून चंद्रपूर वाहतूक शाखेत करण्यात आली आहे.आता सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपपोलिस निरीक्षक यांच्या कुठे कुठे बदल्या होईल याबद्दल उत्सुकता आहे.

Previous articleआनंदाची बातमी :- आता Cyber Fraud मध्ये फसवणूक झालेल्या लोकांना 24 तासात परत मिळतील पैसे?
Next articleमहाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाने जारी केलेले ते परिपत्रक वादात?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here