Home वरोरा धक्कादायक :- नंदोरी खदान येथे ब्लास्टिंग दरम्यान ओम प्रकाश शर्मा यांचा अपघाती...

धक्कादायक :- नंदोरी खदान येथे ब्लास्टिंग दरम्यान ओम प्रकाश शर्मा यांचा अपघाती मृत्यू नसून घातपात?

 

ब्लास्टिंगच्या धंद्यात स्पर्धा व उधारीच्या पैशातील वादावरून ओमप्रकाश शर्मा यांची हत्त्या असल्याचा संशय.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील नंदोरी परिसरात गिट्टी खदानमधे ब्लास्टिंग करीत असतांना पाय घसरून खड्ड्यात पडल्याने ओमप्रकाश शर्मा यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सकाळी घडली असल्याची माहिती असून ती घटना संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे, ओमप्रकाश शर्मा यांना खोल खड्ड्यात  ढकलून एक प्रकारे हत्त्या केल्याची चर्चा असून यामागे कोण आहेत ते तपासण्यासाठी त्यावेळी उपस्थित सुपरवाईजर याला पोलीस खाक्या दाखवला तर नक्कीच या घटनेची खरी माहिती समोर येऊ शकते असे जाणकारांचे मत आहे.

नंदोरी येथील चौपनरीट 53 मधील गिट्टी खदानीत काल सकाळी सहा वाजताच्या दरम्यान ब्लास्टिंग साठी खड्डे करण्यात आले होते, वर्धा येथील मडावी नामक व्यक्तीकडून स्पोटके घेऊन वरोरा येथील स्फूर्ती होल कन्स्ट्रक्शन कंपनीला ब्लॉस्टिंग चा साठा पाठवण्यात आला होता. हा व्यवहार लक्ष्मी नंदन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकाच्या सांगण्यावरून झाला. दरम्यान ओमप्रकाश शर्मा वय 40 हे ब्लास्टिंगचे काम बघत होते व त्यांच्याकडेच सर्व कारभार होता मात्र यामधे वाढलेली स्पर्धा व अनेक गिट्टिखदानच्या मालकाकडे असलेली उधारी यासाठी ओमप्रकाश शर्मा यांचा घातपात करण्यात आल्याची पूर्ण शक्यता असल्याचे समोर येत आहे, कारण कंपनीतील सुपरवायझरने सांगितल्या प्रमाणे
पोलीस स्टेशन मधे तक्रार नोंद न करता कंपनीतील काही लोकांनी मृतदेह सेवाग्राम येथ स्वगृही नेला त्यात कोणतीही पोलीस चौकशी न करता मृतदेह सरळ त्याच्या घरी नेण्यात आल्याने शंकेची सुई लक्ष्मी नंदन लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड व श्रुती हॉल कन्स्ट्रक्शन कंपनी वर जाते. या संदर्भात पत्रकारांनी माहिती घेण्यासाठी फोन केले असता दोन वाजताच्या दरम्यान वरोरा पोलीस स्टेशन येथे माहिती सादर करण्यात आली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असल्याचे बोलल्या जात आहे.पण हा अपघात नसून तो घातपात आहे आणि कंपनीतील सुपरवायझरने मृतकाच्या परिवारास समजावून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे यामधे शंका आणखी बळावली असल्याने या प्रकरणाचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात यावा अशी मागणी आता होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here