Home वरोरा दे धक्का :- नायदेव-मोहबाळा रस्त्यावरून अवजड कोळसा वाहतुकीला बंदी घाला.

दे धक्का :- नायदेव-मोहबाळा रस्त्यावरून अवजड कोळसा वाहतुकीला बंदी घाला.

 

शेतकरी बैलबंडीने बायका पोरं घेऊन धडकले तहसील कार्यालयावर.

तहसीलदार बेडसे पाटील यांचा महत्वपूर्ण आदेश.जडवाहतुक केली बंद

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील नायदेव- मोहबाळा या शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यावरून अवजड कोळसा वाहतुकीला बंदी घाला या मागणीला घेऊन नायगाव व मोहबाळा गावातील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर चक्क बैलबंडी मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला. गावाला जोडणाऱ्या पांदण रस्त्याला कोळसा जडवाहतुक करिता वापरल्या जात असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणेयेणे कठीण झाले आहे एवढा खडतर रस्ता जडवाहतूकीमुळे निर्माण झाला हा रस्ता जडवाहतुकिकरिता बंद करा अशी या दोन गावांची मागणी आहे परंतु प्रशासन ऐकायला तयार नसल्याने शेवटी त्रासलेल्या गावकऱ्यांनी आपल्या बायकां आणि पोरांना घेऊन बैल बंडीतून तहसील कार्यालय गाठलं आणि आपला संताप व्यक्त केला मोठ्या संख्येने आलेल्या गावकऱ्यांच्या या मोर्चाची दखल घेत तहसीलदार बेडसे पाटील यांनी तात्काळ आदेश करून या मार्गावरील जडवाहतुक बंद केल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

नायगाव मोहबाळा या शेतकऱ्यांच्या हक्काच्या रस्त्यावरून अवजड कोळसा वाहतुकी मुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.या संदर्भात प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासन झोपेचे सोंग घेऊन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होते त्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बायका, पोर,बैल बंडी घेऊन,तहसील कार्यालयात निवेदन देऊन कोळसा वाहतूक बंद करण्या साठी ठिय्या मारला, याची दखल घेत तहसीलदार वरोरा यांनी तात्काळ आता आज पासूनच रस्ता अवजड कोळसा वाहतुकीसाठी बंद केल्याचा आदेश तात्काळ काढला असल्याचे गावकऱ्यांच्या शिष्टमंडळ यांना सांगितले यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर. राष्ट्रवादीचे नेते जयंत टेमुर्डे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष विशाल पारखी. मनसे तालुका अध्यक्ष वैभव डहाने व इतर राजकीय सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here