Home चंद्रपूर धक्कादायक :- अष्टभुजा रमाबाई नगर मधील ती हत्त्या दडपण्याचा प्रयत्न?

धक्कादायक :- अष्टभुजा रमाबाई नगर मधील ती हत्त्या दडपण्याचा प्रयत्न?

 

पती व मृतक महिलेच्या आईने पोलिसांत का केली नाही तक्रार?

24 तासांनंतर सुद्धा पोलीस घटनास्थळी पोहचलेच नाही?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

चंद्रपूर शहरातील रमाबाई नगर अष्टभुजा परिसरात काल दिनांक ३ सप्टेंबरला प्रगती जितेंद्र उंदीरवाडे वय 34 वर्ष हिची सकाळी सत्तूर ने वार करून हत्त्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आल्यानंतर सुद्धा मृतक च्या आई व पतीने पोलिसांत तक्रार दिली नसल्याने या हत्येमागे पती किंव्हा आई असल्याची शक्यता बळावली आहे.

काल सकाळी अंदाजे ७.४५ वाजता ही हत्येची घटना घडली असून जखमी अवस्थेत तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात सकाळी भरती करण्यात आल्यानंतर सायंकाळी 5.00 वाजताच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयातील पोलीस चौकीत याची माहिती देण्यात आली आणि आज सकाळी रामनगर पोलीस स्टेशन मर्ग दाखल करण्यासाठी मेमो देण्यात आला तेंव्हा पोलीस स्टेशन मृतकच्या आई ला बोलावण्यात आले पण आई ने माझ्या मुलीने स्वताच स्वताला सत्तूर ने मारून घेतल्याची बनावट कहाणी रचून सांगितले महत्वाची बाब म्हणजे मृतक महिलेच्या पाठीमागे सत्तूर ने वार असल्याने डॉक्टरांनी अगोदरच ही हत्त्याच असल्याची माहिती दिली त्यामूळे पती व तिच्या आई वर हत्त्या करण्याचा पूर्ण संशय असल्याची चर्चा रमाबाई नगर येथे सुरू आहे, आता पोलीस कोणत्या दिशेने तपास करतात यावर या हत्त्येची मिस्ट्रि समोर येऊ शकते.

Previous articleलोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य पदी विलास कावलकर यांची नियुक्ती
Next articleब्रेकिंग :- निजीकरण के मुद्दे पर मोदी सरकारपर हो शकता है देशद्रोह का अपराध दर्ज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here