Home चंद्रपूर क्राईम ब्लास्ट :- चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या क्रमांकाच्या ट्रकला लावली आग.

क्राईम ब्लास्ट :- चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या क्रमांकाच्या ट्रकला लावली आग.

 

अज्ञात आरोपींच्या शोधत पोलिसांची शोध मोहीम सुरू

चंद्रपूर प्रतिनिधी :-

वेकोलि परिसरात आता दादागिरीला मोठी चालना मिळाली असून कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्टरच्या आपसी संघर्षात मोठी गुन्हेगारी वाढली असल्याची चिन्हे आता दिसायला लागली असून वेकोलीचे पैनगंगा कोळसा खाणीत कोळशाची वाहतूक करणाऱ्या ट्रकला पेट्रोल टाकून जाळण्यात येऊन चालकाला सुद्धा मारहाण करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वेकोलीच्या मिनिरत्न दर्जा प्राप्त पैनगंगा कोळसा खाणीत रविवार रात्री साडे नऊ वाजताच्या दरम्यान रेल्वे साईडिंग घुग्घुस वरुन पैनगंगा खाणीकडे जात असलेल्या चड्डा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या MH34 BG 0862 क्रमांकाचे अठरा चाकी वाहनाला चार ते पांच अज्ञात आरोपीने कैलासनगर गेट परिसरात अडविले. त्यानंतर चरणदास शेनुरवार चालकाला खाली उतरवून मारहाण केली आणि पेट्रोलद्वारे ट्रॅक पेटवून दिली.

या घटनेमुळे कोळसा खाण परिसरात खळबळ उडाली आहे. एखाद्या खाणीत प्रवेश करून ट्रक पेटविण्याची ही प्रथमच घटना असून आरोपींना कायद्याचा कुठलाच वचक शिल्लक राहिलेला नाही अशी प्रचिती येत आहे. या प्रकरणात व्यावसायिक प्रतिस्पर्धाअंतर्गत एका ट्रान्सपोर्टर विरोधात षड्यंत्र रचल्या जात असल्याचा भास होत आहे. कारण चार-पाच दिवसापूर्वी उसगाव येथे अन्य ट्रान्सपोर्टरला सोडून याच ट्रान्सपोर्ट विरोधात रास्ता रोको करण्यात आला होता,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here