Home चंद्रपूर त्या पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा केवळ अफवांचा बाजार ?

त्या पत्रकारांना धक्काबुक्की केल्याचा केवळ अफवांचा बाजार ?

 

खबरदार.. बदनाम कराल तर पुराव्यांसह दावा ठोकनार, स्क्रैप व्यापारी हबीब मेमन यांची तंबी.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

दिवाळीच्या पार्श्वभुमीवर पत्रकारांच्या जाहिरात मागणीचा वेग सद्ध्या जोरात आहे, कुठून कसे किती पैसे जाहिरातीच्या नावाखाली मिळेल यासाठी पत्रकारांच्या झुंडीच्या झुंडी आपले सावज शोधत असताना हिंदुस्थान स्क्रैप चे संचालक हबीब मेमन यांच्या यार्ड जवळ एका पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याची चर्चा पत्रकारामधे चर्चील्या जात होती दरम्यान याबाबत कुणी छाती ठोकून सांगायला तयार नव्हते की खरंच त्या पत्रकाराला धक्काबुक्की झाली त्यामुळे यासंदर्भात हिंदुस्थान स्क्रैप चे संचालक हबीब मेमन यांच्याशी संपर्क केला असता ज्या दिवशी ही घटना घडल्याची चर्चा आहे त्यावेळी मी बाहेरगावी होतो आणि कुणाला शिवीगाळ व धक्काबुक्की करणे हे आपल्या कडून कधीच होणार नाही आणि या संदर्भात कुणी आपल्या बाबत तथ्यहीन चर्चा करताहेत ते माझी बदनामी करताहेत त्यामुळे कुणी या संदर्भात माझी सार्वजनिक ठिकाणी चर्चेतून बदनामी केल्यास त्यांच्या विरोधात माझ्या सीसीटीवी कैमेरे च्या फुटेज सह न्यायालयात दावा दाखल करेन अशी तंबी त्यांनी दिली असल्याने सदर चर्चेवर पूर्णविराम लागला आहे.

अगोदरच एकापत्रकाराने चिकन चोरल्याच्या बातम्यांनी पत्रकारितेत हडकम्प निर्माण होऊन त्याची परिणिती हाण्यामाऱ्या पर्यंत झाली होती व पत्रकारितेत एक प्रकारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता आणि आता वादात अडकलेल्या त्या पत्रकाराला धक्काबुक्की झाल्याची अफवा पसरली असल्याने चर्चेला उधाण आले, मात्र ही केवळ अफवा आहे असे खुद्द हिंदुस्थान स्क्रैप चे संचालक हबीब मेमन यांनी जाहीर केल्याने त्या चर्चेवर पडदा पडला असल्याची बाब आता उघड झाली आहे.

Previous articleराजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांनी पुन्हा संकटात सापडलेल्या परीक्षार्थींना दिला मदतीचा हात,
Next articleत्या वसीम भंगारवाल्यांचे येण्याजाण्याच्या रस्त्यांवर केलेले अतिक्रमण हटवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here