Home चंद्रपूर राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांनी पुन्हा संकटात सापडलेल्या परीक्षार्थींना दिला मदतीचा हात,

राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिकांनी पुन्हा संकटात सापडलेल्या परीक्षार्थींना दिला मदतीचा हात,

 

आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना राहण्याची, जेवणाची व गावाला जाण्याची केली अभूतपूर्व व्यवस्था.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

महाराष्ट्रात समाज सेवेचे व्रत घेतलेला पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जे जे लोक संकटात सापडतात ते मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्याकडे मदतीचा हात मागतात हे अख्ख्या महाराष्ट्राने वेळोवेळी बघितले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित आरोग्य विभागाच्या बाहेरील जिल्ह्यातील परीक्षार्थींना एसटी महामंडळाच्या कर्मचारी संपामुळे गावाला जाण्यासाठी बस नव्हती, शिवाय जवळ जास्त पैसे नसल्याने जेवण्याचे वांदे होते मात्र अशा संकटात सापडलेल्या परीक्षार्थींना मनसेचे पदाधिकारी मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्यासह त्यांचे सहकारी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष रविशसिंग, मनवीसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, नितीन टेकाम, करण नायर, तुषार येरमे, व शहजाद सय्यद यांनी मदतीचा हात दिला आणि संकटात सापडलेल्या लोकांना मनसे पदाधिकारी हे नेहमीच मदतीचा हात देतात हे पुन्हा एकदा शीद्ध झाले.

खरं तर ढीगभर आश्वासनापेक्षा संकटात सापडलेल्या लोकांसाठी टीचभर केलेली मदत केव्हाही दखलपात्र असते आणि तेंव्हाच खरी समाजसेवा घडत असते, असाच एक प्रसंग चंद्रपूर जिल्ह्यात घडला असून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात चंद्रपुर येथे अडकलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी रात्रीच्या वेळी जेवण, राहण्याची व्यवस्था इतकेच नव्हे तर त्यांना त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी केलेली गाड्यांची व्यवस्था ही खऱ्या अर्थाने मनसे पदाधिकारी यांची समाजसेवा असल्याचे मत आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देतांना व्यक्त केली.

जिल्ह्यातील आमदार खासदार व इतर लोकप्रतिनिधीचे काय?

लोकप्रतिनिधी हे निवडणुकीच्या प्रचारसभेत भाषण देताना जणू काही ते खरे समाजसेवक आहेत या आविर्भावात स्वतःला सादर करतात पण जेंव्हा जनतेवर संकट येते किंव्हा जेव्हा त्यांच्या खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते तेव्हा मात्र हेच लोकप्रतिनिधी नेमके जातात कुठे? हेच कळत नसून चंद्रपूर येथे अडकलेल्या आरोग्य विभागाच्या परीक्षार्थींनी त्यांच्या ओळखीच्या सगळ्या आमदार खासदार यांच्याकडे मदत मागितली पण कुणीही ती केली नाही पण महाराष्ट्र सैनिक अशावेळी धावून गेले हीच खरी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची शिकवण असल्याची प्रचिती आली. ज्याप्रमाणे राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी व महाराष्ट्र सैनीक नेहमीच संकटात सापडलेल्या लोकांना मदतीचा हात देतात ती खरी समाजसेवा आहे व येणाऱ्या काळात त्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठीशी जनता भक्कमपणे उभी रहायला हवी तरच महाराष्ट्राचे चित्र पालटेल अशी अशा संकटकाळात सापडलेल्या परीक्षार्थींनी व्यक्त केली व मनसे पदाधिकारी यांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here