Home वरोरा स्तुत्य कार्य :- युवा सेनेचे सरचिटणीस मनीष जेठानी यांनी दाखवली उदारता.

स्तुत्य कार्य :- युवा सेनेचे सरचिटणीस मनीष जेठानी यांनी दाखवली उदारता.

 

रात्री 11.00 वाजता केली 7 विद्यार्थ्याच्या राहण्या खाण्याची व्यवस्था.

सुनील दुगड, प्रवीण सुराणा, फाळके सर यांनी मनीष जेटानीचे आभार मानले.

वरोरा प्रतिनिधी:-

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, ब्रम्हपुरीं आणि चिमूर या ठिकाणी आरोग्य विभागाची भरती करिता यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातुन दोन दिवसापूर्वी आलेले 7 मुलं वरोरा येथे रात्री 11 वाजता राहणे आणि जेवनाकरिता व्यवस्था बघत होते मात्र सगळी हॉटेल व खानावळी बंद असल्याने त्यांनी इकडे तिकडे जाणाऱ्या लोकांना विचारले की आम्हची राहण्याची व्यवस्था होईल का? पण कुणीही त्यासाठी त्यांच्या मदतीला आले नाही दरम्यान युवासेनेचे जिल्हा सरचिटणीस मनीष जेठानी यांच्या कार्यालय समोर येऊन त्यांनी आपली व्यथा मांडली असता त्वरित त्यानी रात्री 11.00 वाजता त्यांच्याकरिता अंबादेवी मंदिर येथे राहण्याची व्यवस्था करून दिली आणि घरून स्वयंपाक करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली.यामधे अंबादेवी देवस्थानचे पुजारी सचिन सूंभ यांनी ब्लॅंकेट आणि पाण्याची व्यवस्था करून दिली.

मनीष जेठानी यांच्या या सामाजिक जाणीवेतून केलेल्या कार्याची सर्वत्र चर्चा होत असून सामाजिक कार्यकर्ते सुनील दुगड, प्रवीण सुराणा, फाळके सर यांनी मनीष जेटानी चे यांचे आभार मानले व त्यांच्या कार्याची स्तुती केली. मनीष जेठानी यांच्या या कार्यामुळे सामाजिक कार्य करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना निश्चितपणे प्रेरणा मिळेल असे स्तुत्य कार्य मनीष जेठानी यानी केल्याची प्रतिक्रिया प्रवीण सुराणा यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here