Home वरोरा सनसनी:- खांबाडा येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यास ग्रामपंचायत सत्ताधारी अनुकूल?

सनसनी:- खांबाडा येथे देशी दारूचे दुकान सुरू करण्यास ग्रामपंचायत सत्ताधारी अनुकूल?

 

आजच्या सभेत गावकऱ्यांचा देशी दारू दुकानाला नाही मिळणार पाठिंबा, ग्रामसभेत होणार कडाडून विरोध

वरोरा प्रतिनिधी :-
तालुक्यातील सर्वात महत्वपूर्ण ठिकाण असलेल्या खांबाडा या हायवे लगत गावात प्रभाकर शिंदे यांच्या देशी दारू दुकान सुरू करण्यास ग्रामपंचायत सत्ताधारी यानी अनुकूलता दाखवली असली तरी गावकऱ्यांचा या देशी दारू दुकान व्यवसायाला सक्त विरोध असल्याची चर्चा असून या संदर्भात दिनांक 23/09/2013 च्या ग्रामसभेत ग्रामपंचायतचे अधिकार काढून घेतले असताना सुद्धा त्यानी पुन्हा तोच विषय मासीक सभेत मंजुरी देवून पटालावर घेण्याची खुप मोठी घोडचुक करणे म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत ग्रामसभा अधिनियम 1959ची व मुंबई ग्रामपंचायत [सुधारणा] अधिनियम २००६ ची पायमल्ली होत असल्याचा गंभीर आरोप या गावातील सुज्ञ नागरिक करीत असल्याने ग्रामपंचायत सत्ताधारी यांच्या विरोधात गावकऱ्यांचा मोठा रोष दिसत आहे.

खांबाडा या गावात देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी प्रभाकर शिंदे यानी वरिष्ठ स्तरावर आपली मोर्चेबांधणी केल्यानंतर ग्रामपंचायत मधे आपल्या बाजूने ठराव व्हावा या अपेक्षेने सत्ताधारी यांना राजी करण्यास ते यशस्वी झाले मात्र या देशी दारू दुकानाला स्थानिक गावकऱ्यांचा कडाडून विरोध असल्याने आता या संदर्भात आज दिनांक 1 नोव्हेंबर ला घेण्यात येत असलेल्या ग्रामसभेत काय निर्णय होते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here