Home चंद्रपूर त्या वसीम भंगारवाल्यांचे येण्याजाण्याच्या रस्त्यांवर केलेले अतिक्रमण हटवा.

त्या वसीम भंगारवाल्यांचे येण्याजाण्याच्या रस्त्यांवर केलेले अतिक्रमण हटवा.

 

महानगरपालिका प्रशासनाकडे बिनबा वार्डातिल नागरिकांची तक्रार.

चंद्रपूर प्रतिनिधी :-

बिनचा गेटजवळ असलेला वसीम भंगारवाला याचे भंगार चे बेकायदेशीर दुकान असून येण्याजाण्याच्या रस्त्यांवर त्यांनी भंगार टाकून त्या भंगारांची मोठी गाडी सुद्धा रस्त्यावरच भरत असल्याने या मार्गावर रहदारी करणाऱ्या बिनबा गेट जवळील नागरिकांची मोठी हेळसांड होत असल्याने या परिसरातील जवळपास 30 पेक्षा जास्त लोकांनी चंद्रपूर मनपा आयुक्त यांच्याकडे तक्रार करून वसीम भोला शेठ यांची बेकायदेशीर दुकान त्वरित हटवून रहदारीचा रस्ता मोकळा करून द्यावा अन्यथा महानगरपालिका प्रशासनाविरोधात बिनबा गेट परिसरातील नागरिक मोठे आंदोलन करेन असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.

येण्याजाण्याच्या रस्त्यांवर वसीम भोला शेठ यांनी भंगारचा माल ठेऊन रस्ता जाम केला पर्यायाने अतिक्रमण केल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त आहे. या वसीम ची मुजोरी एवढी आहे की तो कुणालाच जुमानत नाही व बळजबरीने रस्त्यावर माल ठेऊन नागरिकांना त्रास देतो. शिवाय रस्त्याच्या कडेला असलेल्या सांडपाण्याच्या नालीत सांडपाणी असताना त्यात भंगारचा माल टाकल्या जातो त्यामुळे इथून दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांना डेन्गु सारख्या भयंकर मोठ्या आजाराला सामोरे जावे लागत असल्यामुळे या परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन वसीमच्या भंगारच्या दुकानाला हटवण्यात यावे व येण्याजाण्याचा मार्ग सुरळीत करण्यात यावा अशा प्रकारची मागणी त्यानी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here