Home विदर्भ विशेष वार्ता :- विख्यात हास्य कलाकार सुनील पाल यांनी रवींद्र शिंदे यांचा...

विशेष वार्ता :- विख्यात हास्य कलाकार सुनील पाल यांनी रवींद्र शिंदे यांचा का केला गौरव?

 

स्टार वन शो ग्रेट इंडियन लाफ्टर चा विजेता सुनील पाल काय म्हणाला?

भद्रावती प्रतिनिधी :-

भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांच्या कोरोना लॉक डाऊन च्या काळात केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे भारतीय चित्रपट जगात एक दमदार हास्य कलाकार म्हणून व एक्टर आणि व्हाईस आर्टिस्ट म्हणून सुनील पाल यांनी त्यांची जी स्तुती केली व जो गौरव केला ते ऐकून भल्याभल्यांना आश्चर्य वाटलं की एवढ्या मोठ्या कलाकारांनी रवींद्र शिंदे यांच्या कार्याचा गौरव कसा काय केला? पण विदर्भाची शान असलेल्या विख्यात विनोदी कलाकार सुनील पाल यांनी रवींद्र शिंदे यांच्याबद्दल बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या त्या अशा होत्या की “कोरोना संकटकाळात गोरगरीब व कोरोना रुग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या सोबत उभे राहून रवींद्र शिंदे यांनी जे कार्य केले जे खरोखरच अभिमानास्पद आहे. रवींद्र शिंदे यांच्या टीम चे मी आभार मानतो आणि अशीच सेवा आपल्याकडून सुरू ठेवा असे आवाहन सुद्धा त्यांनी केले.

कोण आहेत सुनील पाल?

सुनील पाल यांचा जन्म 19 सप्टेंबर, 1975 मधे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला.त्यांचे माध्यमिक शिक्षण जनता विद्यालय सिटी बल्लारपूर येथील शाळेत झाले, ते सन 1995 मधे मुंबई ला गेले आणि तिथेच छोटे मोठे काम करून सन 2005 मधे ग्रेट इंडियन लाफ्टर चे विजेता बनले व त्यानंतर त्यांना हिंदी चित्रपटात हास्य कलाकार म्हणून भूमिका मिळायला लागल्या. त्यांचे भारतात व भारताबाहेर सुद्धा (हास्य)विनोदी कार्यक्रम होतात.

2005 या वर्षी सुनील पाल यांनी “भावनायो को समझो” या मधे लिखाण केले व व त्या शो चे निर्देशन पण केले, यामधे सुनील पाल यांनी आतापर्यंत जवळपास 51 स्टेज शोज मधे स्टैंडअप कॉमेडी केली आहे. सुनील पाल यांची किस्मत बदलली ती स्टार वन च्या शो ग्रेट इंडियन लाफ्टर मधे. या शो मधे जिंकल्यानंतर त्यांच्याकडे अनेक फिल्म डायरेक्टर आले आणि चित्रपटात काम मिळाले ज्यामध्ये त्यांच्या छोट्या मोठ्या भूमिका आहे. त्यांचे हम, फिर हेरा फेरी, अपना सपना मनी मनी., बॉम्बे टु गोवा, मनी बैंक गैरेंटी,मैं हूं रजनीकांत, डर्टी पॉलिटिक्स, तेरी भाभी है पगले इत्यादी चित्रपटात काम केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here