Home विदर्भ रवींद्र शिंदे यांची शिवसेनेच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती.

रवींद्र शिंदे यांची शिवसेनेच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती.

शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी घेतला महत्वपूर्ण निर्णय.

वरोरा प्रतिनिधी :

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जिल्ह्यात नव्याने नियुक्त्या देण्याचा सपाटा लावला आहे अशातच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा मागील अनेक दिवसांपासून प्रलंबीत वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात सामाजिक नेते रवींद्र शिंदे यांची नियुक्ती रडखडली होती, मात्र आता रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे व तशी बातमी दैनिक सामना मधे आल्याने शिंदे समर्थकांनी एकच जल्लोश केला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात शिवसेना पक्षाची ताकत जर कुठे आहे तर ती वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात आहे हे खरे असले तरी त्या तोडीचा  उमेदवार शिवसेनेत नव्हता त्यामुळे साम दाम दंड भेद या आयुधाचा वापर करून या विधानसभा क्षेत्रात रवींद्र शिंदे सारखा बलाढ्य उमेदवार शिवसेनेला मिळाला असल्याने शिवसैनिकांमधे आनंद व्यक्त होतं आहे. रवींद्र शिंदे यांची विधानसभा निवडणुकीत उमेदवारी पक्की मानली जातं असल्याने प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.

रवींद्र शिंदे यांची विधानसभेची उमेदवारी पक्की ?

काही महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी पक्षात विधानसभा प्रमुख हे पद निर्माण करून ते पद ज्यांच्याकडे असेल तेच पदाधिकारी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार असेल अशी घोषणा केली आहे.दरम्यान रवींद्र शिंदे यांना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या उमेदवार जाहीर केल्याचे स्पष्ट होतं आहे त्यामुळं शिवसेनेची उमेदवारी शिंदे यांना पक्की झाल्याने पक्षातील सगळे शिवसैनिक कामाला लागेल असे चित्र सद्ध्यातरी दिसत आहे.

Previous articleभाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची चंद्रपुरात सोमवारला विजय संकल्प जाहीर सभा
Next articleनववर्षांच्या पूर्व संध्येला अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळीचा झाला गेम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here