Home वरोरा नववर्षांच्या पूर्व संध्येला अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळीचा झाला गेम.

नववर्षांच्या पूर्व संध्येला अवैध रेती तस्करी करणाऱ्या टोळीचा झाला गेम.

वर्धा नदीचे नैसर्गिक स्त्रोत पात्र वळवून अवैध रेती तस्करी करीत असलेल्या तस्कराच्या उपविभागीय पोलीस अधिकारी नोपानी यांनी आवळल्या मुसक्या.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहा. पोलीस अधीक्षक आयुश नोपानी हे रुजू झाले तेव्हापासून वरोरा भद्रावती या दोन तालुक्यातील अवैध रेती करणाऱ्या माफियांवर मोठ्या कारवाया त्यांनी करून या क्षेत्रातील राजकीय वरदहस्त असणाऱ्या रेती माफियांच्या मुसक्या आवळल्या असल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान नवंवर्षांच्या पूर्व संध्येला म्हणजे ३१ डिसेंबरला दुपारी १३.०० वा चे दरम्यान सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुश नोपानी यांनी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार करजी रेती घाटावर वर्धा नदीच्या पात्रात धाड टाकून अवैधरित्या पोकलॅन्ड द्वारे रेतीचा वर्धा नदीपात्रातुन उपसा होत असल्याचे व चोरट्या मार्गाने रेतीचे वाहतुक केली जातं असल्याचे स्पष्ट झाल्याने अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने त्यांच्या पथकांनी मोठी कारवाई केली. सदर नदीत पर्यावरणाचा बट्ट्याबोळ करून नदी पात्रातील नैसर्गिक प्रवाहाला बदलण्याचा प्रयत्न रेती तस्करांनी केल्याचे समोर आल्याने रेती चोरीच्या नादात पर्यावरण संतुलन बिघडले असल्याचे दिसते.

सदर कारवाई सहा. पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी, पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे, व त्यांची चमू पोहवा / २८८ मुनेश्वर, पोहवा / १००० दादाजी, पोहवा २२४४ दिलीप नापोशि/ १२२८ नितीन पोशि/ २९१२ सचिन, पोशि/ १३३० सुशांत यांनी सदर कारवाई करून पंचासमक्ष मुद्देमाल जप्त केला.

या कारवाई मधे सहा हायवा ट्रक, दोन पोकलॅन्ड जप्त करण्यात आले व रेती घाट मालकाने नदी पात्रात रेती व मुरूम याचा छोटा बंधारा बांधुन नैसर्गीक नदी प्रवाह खंडीत करून प्रवाहाची दिशा बदलवली त्याबद्दल लेखाजोखा घेतला. या कारवाई मधे नदी पात्रात उभे असलेले ट्रकांतील भरलेली रेती पोलीसांना पाहाताच जागीच नदी पात्रात खाली केली व तेथून पळुन जाण्याचा काही ट्रक ड्रायवर ने प्रयत्न केला. त्या मध्ये काही हायवा ट्रक हे जागीच मिळुन आल्याने पो स्टाफचे मदतीने पकडण्यात आले.

कारवाई मधे खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला.

१) किंमत रु. २५ लाख TATA 1318 MH 34 A8 9872 चा चालक सुरज प्रकाश टोंगे वय २३ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा. कासमपंजा वार्ड वरोरा

२) किंमत रु. १० लाख TATA 1616 MH 34 AB 4356 चा चालक रोशन अनंता दाते, वय २५ वर्षे, धंदा ड्रायव्हर रा भटाळा पो.स्टे. शेगाव,

३) किंमत रु. २० लाख TATA 2518 MH 40 BG 2475 चा चालक राजेश रामकृष्ण उके, वय २७ वर्ष, घंटा

डायकर, रा वर्षा पुलफैल वर्षा ४) किंमत रू. २० लाख TATA 2518 MH 34 AV 2353 चा चालक संदीप बालाजी कुबडे, वय ४२ वर्षे

चंदा ड्रायव्हर, रा. घोडदरा ता मारेगाव जिल्हा यवतमाळ:

14) किंमत रु. २० लाख TATA 2518 MH 40 AK 1212 चा चालक प्रशांत मारूती कोल्हे, वय ४२ वर्षे. धंदा ड्रायकर, सुभाष वार्ड हनुमान आखाडा वरोरा क) किंमत रु. २५ लाख TATA 3118 MH 27 BX 1199 या चालक आशिष दिलीप लावट वय २६ व

धंदा ड्रायव्हर, रा. पेंदुर ता वणी पोस्ट मुकनेगाव जिल्हा यवतमाळ ७) पीसी २२० पोकलॅंड किंमत रु ४० लाख चालक रवि प्रलाद वाघमारे, अन्य २६ वर्षे, रा. गोधनी ता. जि. यवतमाळ

(८) पीसो २२५ पोकलॅन्ड HITACHI किंमत रु ४५ लाख चा चालक विवेक कजी राऊत, वय २९ वर्ग में

वरील वर्णनाचा मुद्देमाल एकुण किंमत रु २,७५,००,००० (दोन कोटी पाच लाख) आम्ही सपोनि निलेश चवरे यांनी दोन पंचासमक्ष १८.४० वा जप्त केला वरील मुद्देमालाचे चालक व रेती घाट मालक यांनी अवैध्य पोकलॅन्डचा वापर करून मा जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे आदेशाचे उल्लंघन करून वर्धा नदीचे पात्रातुन जाणीव पुर्वक स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता उत्खनन करून रेती चोरीचा प्रयत्न केला. तसेच वर्धा नदीचे पात्रात रेती, दगड गोटे मुरुमाचे सहायाने पात्रात आगळीक केली. तसेच नदीचे पात्र दुषीत करून जे पाणी पिण्यायोग्य आहे ते दुषीत करण्यास कारणीभूत झाले तसेच गैरपणे पाण्याचे दिशेत बदल करून पोकलॅन्ड व हायवाने प्रमाणाबाहेर रेतीचे अवैध उत्खनन करून शेती मध्ये व पिण्याचे पाण्यामध्ये पट होईल याची त्यांना जाणीव असताना सुद्धा तशी कृती केली. अशा प्रकारे कृती करून नदीच्या निचरा प्रक्रीयेस ती पोहचविली. सदर प्रकार हा रेती घाट मालक १) प्रदिप घागी २) काशीफ खान यांचे संगणमताने केला असल्याचे वर नमुद चालक सांगत असल्याने चोरटी वाहतुक करण्याचे उद्देशाने वर्धा नदीचे पात्रात आले म्हणून घाट मालक, चालक यांचे विरुद्ध कलम ३७९.५११.४३०, ४३१.१०९.१८८.३४ भा.द.वि. सह कलम ४८(७) (८) म.ज.म अधिनियम १९६६ अन्वये माझी कायदेशिर फिर्याद करण्यात आली आहे.

Previous articleरवींद्र शिंदे यांची शिवसेनेच्या वरोरा-भद्रावती विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती.
Next articleटायगर ग्रुपचे रिषभ रठ्ठे यांच्या वाढदिवसानिमित्त वरोरा येथे भव्य रक्तदान,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here