वस्ताद जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्णाखाली रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन.
वरोरा प्रतिनिधी :–
वस्ताद जालिंदर भाऊ जाधव टायगर ग्रुप संस्थापक अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या मार्गदर्णाखाली टायगर ग्रुपच्या रिषभ रेठ्ठे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ३१ डिसेंबरला स्थानिक अंबादेवी मंदिराचे परिसरात करण्यात आले या रक्तदान शिबिरात एकूण 45 जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
स्थानिक अंबादेवी मंदिरात लाईफ लाईन रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिरात अध्यक्ष म्हणून विधानसभेचे माजी उपसभापती डॉ. मोरेश्वर टेमुर्डे, सीडीसीसी बँकेचे संचालक रवींद्र शिंदे, माजी नगराध्यक्ष अहेतशाम अली, उद्योगपती रमेश राजूरकर, विनोद खोब्रागडे, दत्ता बोरेकर, राजेंद्र मर्दाणे, प्रवीण सुराणा, प्रवीण गंधारे,सलीम पठाण. उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात टेमुर्डे म्हणाले की, रक्तदान करून एखाद्याला जीवनदान मिळू शकते. म्हणूनच प्रत्येकाने रक्तदान करावे, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे.
शिबिराची सुरुवात अंबादेवीचे पूजन करून करण्यात आली. शिबिरात तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. संचालन आकाश पुनवटकर यांनी केले तर आभार रिषभ रेठ्ठे यांनी केले रक्तपेढीचे कर्मचारी, यशस्वी टायगर ग्रुपचे सदस्य बाला चांभारे, मारोती नामे, प्रीतम ठाकरे, मंगेश मगरे, ओम कार्लेकर, प्रवीण खीरटकर, मुकेश पाटील, रोशन कुलसंगे, विक्की गवई, महेंद्र तमगाडगे, नरेश ठाकरे, रोहन नंनावरे, हर्षल भोस्कर व अनेक सदस्य उपस्थित होते.