Home वरोरा धक्कादायक :- एका चतुर शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग ?

धक्कादायक :- एका चतुर शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग ?

गुरू शिष्यांच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या शिक्षकांविरोधात पोलीस तक्रार नसल्याने आश्चर्य.

न्यूज नेटवर्क :-

शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात व्यभिचारी व्यक्तींचा भरणा असल्याने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या शिक्षकाकडून आदर्श घेऊन समोरची पिढी घडते तो शिक्षकच जर विद्यार्थीनीचा विनयभंग करत असेल तर मग अशा शिक्षकांचे करायचे काय ? हा प्रश्न समाजमनाला सुन्न करणारा आहे. अशीच एक दुर्दैवी घटना तालुक्यातील एका मोठ्या गावच्या शाळेत घडली असून त्या चतुर शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग करून पळ काढला पण विद्यार्थीनीच्या परिवाराकडून त्या नालायक शिक्षकांची तक्रार पोलिसांत केली नसल्याने तो शिक्षक तोंड लपवून सेट्टिंग करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती चर्चेचा विषय बनत आहे.

तालुक्यातील काही भागात या शिक्षकाच्या चर्चा होतं आहे की आ शिक्षकाची ही पहिलीच वेळ नाही तर या अगोदर सुद्धा त्याने असले प्रकार केले होते दरम्यान हा मामला कुठले वळण घेइल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र या शिक्षकाविरोधात तक्रार झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जातं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here