Home वरोरा चिंताजनक :- यंदाही झाली कापूस पिकाची उलंगवाडी. कापूस उत्पादनात घट.

चिंताजनक :- यंदाही झाली कापूस पिकाची उलंगवाडी. कापूस उत्पादनात घट.

सरकारच्या दुटप्पी धोरणाचा शेतकऱ्यांना फटका, कापसाचे भावही माघारले, शेतकरी चिंतेत.

मनोहर खिरटकर :-

शेतकऱ्यांना एकीकडे अस्मानी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागताहेत तर दुसरीकडे शासनाच्या दुटप्पी धोरणाचा फटका व त्यामुळे पिकांचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढते अशातच यंदाही डिसेंबर अखेर कापूस पिकाची उलंगवाडी झाली.त्यामुळे कापूस उत्पादनाची आशा हिरावलेली आहे. उत्पादनात कमालीची घट आणि कापसाचे बाजारभाव माघारल्याने शेतकरी विवंचनेत आहे. वरोरा तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.

यावर्षी झालेली अतिवृष्टीने पिंकाची वाढ़ खुंटली, बऱ्याच शेतकऱ्यांनी अती पावसामुळे नुकसान झालेले पीक मोडून रब्बी हंगामी पिकांची पेरणी केली. जेमतेम आलेल्या कापूस पिकावर शेतीचे गणित अवलंबून असतांना काही शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणे जिकरीचे झाले आहे. कापूस पिकात लावलेले तूर पीक मर रोगाने हातचे गेले. यावर्षी कापूस पिकाची उत्पादन सरासरी 3 ते 5 किंटलची आहे. मात्र या वर्षी 30 टक्क्याने उत्पादन खर्च वाढल्याने कापूस उत्पादकांना मिळणारा नफा नाहीसा आहे.मागील वर्षीच्या तुलनेत कापूस पिकाचे भाव चांगले मिळतील या आशेवर पाणी फेरल्या गेले. मागील वर्षी सरसरी 10 हजार रुपये शेतकऱ्यांना प्रती किंटल भाव मिळाला. मात्र यावर्षी 2 हजार रुपयाने भाव पडल्याने शेतकरी चिंतातूर आहे.

लोकप्रतिनिधींचे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मौन ?

शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घ्यायला कुणीच तयार नाही, शेती व्यवस्थेच्या अनुषंगाने विविध सामाजिक राजकीय संघटना, लोक प्रतिनिधी या विषयाकडे मौन घेऊन असल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे. रब्बी हंगामी येणाऱ्या पिकाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणिताची भिस्त कायम आहे. मात्र या गंभीर विषयाकडे संबंधित संघटनी आवाज उठविण्याची गरज आहे.

कापूस उत्पादनात कमालीची घट.

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्पादनावर परिणाम झाला. पिकाची वाढ खुंटली, तर उशिरा बहर आल्याने कापूस पिकाला लागणाऱ्या बोन्ड भरणीत कमतरता राहिली. त्यामुळे यावर्षी एकरी 3 ते 5 किंटल सरासरी उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले

उत्पादन खर्चात 30 टक्के वाढ़

अती पावसामुळे पिकांना दिलेले खत वाहून गेले. परिणामी शेतकऱ्यांचा खतावरील होणारा खर्च निष्फळ ठरला. 2 वेळा खत व्यवस्थापन करण्यात ऐवजी 4 वेळा शेतकऱ्यांना खत व्यवस्थापन आणि निंदन खर्च करावा लागला आहे.त्यामुळे 30 टक्के उत्पादन खर्च वाढला.

भावात 20 टक्क्यानी घसरण.

मागील वर्षी 10 हजार रुपयाच्यावर कापसाला भाव होता. मात्र यावर्षी 20 टक्क्याने भाव पडल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत अडकलेले आहे.

Previous articleधक्कादायक :- एका चतुर शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग ?
Next articleरिपोर्ट कार्ड जनतेत घेऊन जाणे ही भाजपाची संस्कृती, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचे प्रतिपादन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here