Home विदर्भ कृषी संदेश :- सेंद्रिय शेती अभावी देशातील जनतेचे आरोग्य धोक्यात!

कृषी संदेश :- सेंद्रिय शेती अभावी देशातील जनतेचे आरोग्य धोक्यात!

 

देशात नवी क्रांती करण्यासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज.

कृषी संदेश :-

सद्यस्थितीत शेतकऱ्यांची स्थिती अतिशय नाजूक आहे, त्यातल्या त्यात आपला वैदरभीय शेतकरी परंपरागत पीक पद्धती सोडायला तयार नाही. कारण बदलत्या युगात आरोग्याच्या द्रुष्टीने पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. कारण आपला शेतकरी ज्या जमिनीवर शेती करीत आहे ती जमीन वर्षानुवर्षे रासायनिक खताचा मारा करून मृतप्राय बनवीत आहे पण आपल्या शेतकऱ्याना हे लक्षात घ्यायला हवे की दरवर्षी उत्पनाच्या आशेनी भरमसाठ रासायनिक खत व कीटकनाशक याची खरेदी करून ते केवळ कृषी केंद्र वाल्यांना श्रीमंत करीत आहे, मात्र स्वतः कर्जबाजारी होत आहे. दोन पिढ्यांच्या आधीचा जर आपण विचार केला तर आपले आजोबा, पणजोबा यांचं शेतीच्या बाबतीत जबरदस्त व्यवस्थापन होत.

आपले आजोबा पणजोबा हे शेत रिकामं झाल्यावर ते जमिनीची मशागत करायचे, मशागत म्हणजे निव्वळ नागरनी, वखरणी नाही तर शेतामध्ये कंपोस्ट खत, शेणखत भरून जमिनीची मशागत करायचे, त्यातून जिवाणू हे जमीन सुपीक करायचे, पहिला पाऊस पडताच जमिनीतून जागोजागी गांडूळ निघायचे यामुळे आपोआप जमिनीत प्रक्रिया व्हायची त्यामुळे उत्पन्न एवढे निघायचं कि ठेवायला घरात जागा व्हायची नाही, घराच्या बाहेर ढोल्यामध्ये धान्य ठेवावे लागायचे, कोणत्याही खेड्यात गेल्यावर धान्याचे ढोल्या घरोघरी दिसायच्या, आज अशी परिस्थिती आहे काय पीक हाती येताच आपण लगेच ते विकतो व उतारी मिळाली नाही म्हणून प्रत्येक जण सांगतो, याला कारण आपणच, कारण आपल्या जमिनीवर रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करून आपण जमिनीची पोत बिघडवलीच नाही तर तिला मारून टाकले आहे, आपल्या आजोबा पणजोबानी अशी जमीन आपल्याला दिली होती काय? व भविष्यात आपण आपल्या मुलाबाळांना अशी जमीन सोपाविणार आहे काय? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

महत्वाचे म्हणजे मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र येथे आजही सेंद्रिय शेती केली जाते, कमी जागेत भरघोस पीक ते घेत आहे, अल्प पावसाचा त्यांना फटका बसत नाही कारण जमीनच त्यांनी तशी बनविली आहे, नगदी पैसा त्याच्या हातात खेळतो आपल्या सारखं त्याना डोकक्याला हात लावून बसण्याची पाळी येत नाही म्हणून शेतकरी बांधवानो सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे.आणि ती शेती जर विदर्भातील शेतकऱ्यांनी केली तर आपल्या आरोग्यासोबतच आपली श्रीमंती वाढेल व शेतकरी संपन्न होईल अन्यथा सेंद्रिय शेती अभावी जनतेचे आरोग्य धोक्यात येईल …
….जगदीश लांडगे वरोरा 7798263587

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here