Home विदर्भ डिजिटल मीडिया प्रतिनिधिंचे पहिल्या दिवशीच गाजले अधिवेशन?

डिजिटल मीडिया प्रतिनिधिंचे पहिल्या दिवशीच गाजले अधिवेशन?

डिजिटल मीडियाच्या प्रतिनिधिंना काय मिळणार संरक्षण? काय आहे जेष्ठ विधीज्ञ यांचा सल्ला.

चितेगाव अधिवेशन स्पेशल :-

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबर रोजी मूल तालुक्यातील चितेगाव येथील एल्गार प्रतिष्ठान कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले आहे या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अध्यक्षस्थानी असलेल्या डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा यांनी अनेक उदाहरणे देऊन गाजवले तर डिजिटल मीडिया प्रतिनिधीनां त्यांच्या पोर्टल ला अपेक्षित पूर्ण ज्ञान प्रोजेक्टर द्वारे या देवनाथ गंडाटे यांनी देऊन या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाची कार्यशाळा घेऊन सांगता केली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विधीज्ञ ॲड. आनंद देशपांडे, ॲड. डॉ. कल्याणकुमार आणि जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां अँड पारोमिता गोस्वामी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर डिजिटलमीडिया असोसिएशन चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडियाउपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सिद्धावर यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश एकोनकर यांनी केले.

या अधिवेशनात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ४५ नोंदणीकृत विविध माध्यम प्रतिनिधी सहभागी झाले होते. या दोन दिवशीय अधिवेशनाला प्रमुख मार्गदर्शन करणारे उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा यांनी प्रसारमाध्यंमांच्या बदलत्या स्वरूपाची मांडनी करताना न्यायालयातील प्रकरणाचे दाखले देत तुम्ही घाबरू नका पण कायाद्याचा अभ्यास करून बातमी लिहा या संदर्भात तुम्हाच्यावर काही खोटे गुन्हे दाखल असतील तर त्यावर काय करायचे याचे मार्गदर्शन व मदत आम्ही देऊ असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले. या बाबतीत त्यांनी जेष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार यांच्या एका न्यायालयीन खटल्याचा संदर्भ देऊन शेवटी पत्रकार कसा जिंकतो याचा त्यांनी किस्सा सांगितला व सल्ला दिला की आपली भूमिका प्रखरपणे मांडा तुम्हची दखल नक्कीच घेतल्या जाईल. दरम्यान डिजिटल मीडियाच्या पत्रकारांनी कशा प्रकारे बातम्या लिहाव्या व केंद्र शासनाच्या नव्या डिजिटल कायद्याचा कसा फायदा घ्यावा या संदर्भात उपस्थित पत्रकारांना यथेच्छ मार्गदर्शन केले. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना एक प्रकारे नवी ऊर्जा या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here