Home लक्षवेधी लक्षवेधी:- राज्यपाल कोशारी नेहमी राजे शिवछत्रपतींच्या बाबतीत चुकीचे का विधाने करतात ?

लक्षवेधी:- राज्यपाल कोशारी नेहमी राजे शिवछत्रपतींच्या बाबतीत चुकीचे का विधाने करतात ?

भाजपच्या नेत्यांना महाराष्ट्र आणि शिवछत्रपतींबद्दल इतका गैरसमज कशासाठी?

लक्षवेधी :-

राज्यपाल भगतसिंह कोशारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी तुलना करून पुन्हा एका नव्या वादाला जन्म दिला आहे. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये राज्यपाल कोशारी म्हणाले की शिवराय जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’ या आधीही राज्यपालांनी संभाजीनगर (औरंगाबाद) मध्येच २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा गौरव दिवस आणि श्री दासनवमी निमित्त आयोजित केलेल्या समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात ‘चाणक्याशिवाय चंद्रगुप्त नाही, तसेच समर्थांशिवाय शिवाजी महाराज नाहीत,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर बरेच पडसाद उमटले. नंतरच्या अधिवेशनात अभिभाषणावेळी याबाबत झालेल्या घोषणाबाजीमुळे राज्यपाल अभिभाषण न करताचं राजभवनाकडे निघून गेले होते. दरम्यान आता शिवाजी महाराजांबद्दल पुन्हा केलेलं वक्तव्य राजापालांना भोवणार का असा प्रश्न आहे?

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagatsingh Koshyari) कायम कोणत्या न कोणत्या वक्तव्यामुळे वादात सापडत आहेत.भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करत नव्या वादाला फोडणी दिली आहे. ‘शिवराय जुन्या काळातील आदर्श तर नितीन गडकरी हे सध्याचे आदर्श आहेत’ असे वक्तव छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) मध्ये केले आहे. दरम्यान शिवरायांना जुन्या काळातील आदर्श म्हंटल्यामुळे नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. तसं पाहता राज्यपाल हे मराठी माणूस आणि महाराष्ट्रातील थोर पुरुषांच्या बाबतीत नेहमीच वादग्रस्त विधाने करतात व भाजप चे नेते मग त्यात सारवासारव करतात असा आजवर इतिहास राहिला आहे. गुजराती आणि मारवाडी यांना काढल्यास मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, या वक्तव्याने यापूर्वी ही कोश्यारी वादात सापडले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासाठी वाद हे काही नवे नाहीत. त्यांनी पदभार स्वाकीरल्यापासून अनेकदा ते वादात सापडलेले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल यांच्यातील वाद चव्हाट्यावरही आला होता. इतकेच नाही तर कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. सावित्रीबाई फुले, समर्थ रामदास आणि शिवराय यांच्याबाबत राज्यपालांनी केलेली वक्तव्येही वादात राहिली आहे. त्याचा परिणाम थेट विधिमंडळाच्या अभिभाषणावरही झाला होता. त्यांचे काही निर्णयही वादग्रस्त ठरले. ठाकरे सरकारच्या काळात राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नावांना त्यांनी अखेरपर्यंत मान्यता दिली नव्हती. इतकंच काय तर ठाकरे सरकारला विश्वासमत ठराव मांडण्याचे दिलेले आदेश, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी हे त्यांचे निर्णय अद्यापही न्याय प्रलंबित मानले जातात.

भाजपचा छत्रपती शिवरायांबाबत छुपा एंजडा काय ?

भाजपचे नेते नेहमीच कुठला ना कुठला वाद शिवछत्रपतींच्या बाबतीत निर्माण करून एक प्रकारे त्यांचा छुपा एंजडा ते वापरात आहे का ? हा प्रश्न आता निर्माण होतं आहे. भाजप च्या नेत्यांनी अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवरायाशी तुलना करत त्यांच्या वेशात नरेंद्र मोदी यांना फोटोत दाखवले. भाजपचे राज्यपाल कोशारी यांनी पुन्हा छत्रपती शिवरायांचा अपमान करत नितीन गडकरी यांची तुलना त्यांच्याशी केली एवढेचनव्हे तर आता भाजप चे केंद्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी वीर सावरकरांच्या बाबतीत ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रावर बोलताना म्हणाले, की “सावरकरांनी माफी मागितली, हे जे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता माफीनाम्याची गोष्ट आहे, तर त्या काळात अनेक लोक बाहेर पडण्यासाठी एका विशिष्ट प्रकारे माफी मागायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचवेळा औरंगजेबाला पत्र लिहिलं होतं. त्याचा अर्थ काय?”, असं विधान सुधांशू त्रिवेदीनं केलंय. यावरून भाजपचा छुपा एजंडा नेमका काय आहे ? हे कळायलामार्ग नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here