Home चंद्रपूर लक्षवेधक;- डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन चितेगावला.

लक्षवेधक;- डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन चितेगावला.

डिजिटल मीडियाचे स्वरूप व त्यात कायदेशीर बाबींवर प्रकाश टाकणारी कार्यशाळा आयोजीत.

चंद्रपूर :

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन 19 व 20 नोव्हेंबर रोजी मूल तालुक्यातील चितेगाव येथील एल्गार प्रतिष्ठान कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले आहे.

दोन दिवसीय अधिवेशनाच्या उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. फिरदोस मिर्झा राहणार आहेत. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे विधीज्ञ ॲड. आनंद देशपांडे, ॲड. डॉ. कल्याणकुमार यांची उपस्थिती राहणार आहे.

अधिवेशनात आयोजित विविध सत्रांत ज्येष्ठ सामजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, वरिष्ठ पत्रकार आनंद आंबेकर, ॲड. फरहात बेग, झी २४ तासचे प्रतिनिधी आशिष अंबाडे, दैनिक नवराष्ट्रचे जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर, ई टीव्ही भारतचे प्रतिनिधी अमित वेल्हेकर यांचे मार्गदर्शन होईल. डिजिटल मीडिया कार्यशाळेत देवनाथ गंडाटे मार्गदर्शन करणार आहेत.

यावेळी डिजिटल मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र चोरडिया, कार्याध्यक्ष विजय सिद्धावार, जितेंद्र जोगड, राजू बिट्टुरवार, दिनेश एकवणकर आणि सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील ४५ नोंदणीकृत विविध माध्यम प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. हे अधिवेशन निवासी असून, नव पत्रकारिता, माहिती व तंत्रज्ञान यावर विशेष प्रशिक्षण होणार आहे.

Previous articleमनसेच्या भद्रावती येथील बैठकीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.
Next articleडिजिटल मीडिया प्रतिनिधिंचे पहिल्या दिवशीच गाजले अधिवेशन?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here