Home भद्रावती मनसेच्या भद्रावती येथील बैठकीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

मनसेच्या भद्रावती येथील बैठकीत अनेक पक्षातील कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश.

वरोरा तालुक्यात पक्ष संघटन बांधणीनंतर भद्रावती तालुक्यात येणार संघटन बांधणीला वेग.

भद्रावती प्रतिनिधी :-

चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात मनसे नेते रमेश राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व जिल्हा सचिव विनोद सोनटक्के यांच्या पुढाकाराने गांव तिथे शाखा व वार्ड तिथे शाखा ही मोहीम राबविण्यात येत असून वरोरा तालुक्यात मजबूत पक्ष बांधणी झाल्यानंतर आता भद्रावती तालुक्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा मोर्चा वळला आहे. त्याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी मनसे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांच्या अध्यक्षतेखाली भद्रावती येथील व्रुन्दावन लॉन सभागृहात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मनसेचे कट्टर महाराष्ट्र सैनिक युगल ठेंगे यांच्या नेत्रुत्वात मनसेत प्रवेश केला. यावेळी मनसे नेते रमेश राजूरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.

भद्रावती शहरात सन २०१३ मनसेची मोठी ताकत होती व त्यावेळी मनसेचे नगरपरिषद निवडणुकीत तब्बल 23 उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात काही उमेदवार थोड्या मतांनी पडले मात्र त्यानंतर पक्षांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून ज्यांना पदे देण्यात आली त्यांनी पक्ष संघटनेला बळकटी दिली नसल्याने पक्ष संघटन संपुष्टात आले त्याचा फटका मागील २०१९ च्या निवडणुकीत पक्षाला बसला व पक्षाचे उमेदवार रमेश राजूरकर यांना भद्रावती तालुक्यात फर कमी मतदान मिळाले. या सर्व परिस्थितीवर मात करून पुन्हा पक्षाची मजबूत बांधणी करण्यासाठी दिनांक १५ नोव्हेंबरला बैठक घेण्यात आली त्यात विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. याप्रसंगी मनसे नेते रमेश राजूरकर यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुकीत व त्यानंतर भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे त्यासाठी मी आपल्याला सर्वोतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली. यावेळी मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे जिल्हा सचिव विनोद सोनटक्के भद्रावती तालुका अध्यक्ष रोहित वाभिटकर. शहर अध्यक्ष अजय महाकुलकर. मनसे जनहित कक्ष विभाग जिल्हा सचिव रमाकांततिवारी जिल्हा उपाध्यक्षरमेश कालबान्धे. मनसे महिला जिल्हा उपाध्यक्षा मंदा वरखडे शहर अध्यक्षा विभा बेहरे हसन शेख. महादेव वरखडे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी मनसेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन  सत्कार करण्यात आला.

दरम्यान मनसे कट्टर महाराष्ट्र सैनिक युगल ठेंगे यांच्या नेत्रुत्वात अभी उमरे शुभम धुर्वे प्रज्वल काकडे अर्पित मांडवगडे निखिल उगे शंकर बोंडे अमित उगे प्रतीक राहुल दैवलकर निहाल चिकाटे सचिन वरखडे निखिल बावणे पंकज ताजने सुनील तुचेकर साहिल बोनगिरी साहिल वालदे व इतर कार्यकर्त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पक्षाच्या दुपट्टा खांद्यावर टाकून मनसेत प्रवेश केला.

Previous articleसालोरी गावातील नागरिकांची विशाखा राजूरकरांच्या पुढाकाराने पालकमंत्र्याकडे धाव.
Next articleलक्षवेधक;- डिजिटल मीडिया प्रतिनिधींचे दोन दिवसीय अधिवेशन चितेगावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here