Home क्राईम स्टोरी क्राईम :- राष्ट्रवादीचे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्यावर प्राणघातक हल्ला.

क्राईम :- राष्ट्रवादीचे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष यांच्यावर प्राणघातक हल्ला.

 

हल्ला करण्याच्या कारणांचा पोलिस घेत आहे शोध.

न्यूज नेटवर्क :-

राज्यात राजकीय गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली असून राजकीय वैर कुणाच्या जीवावर बेतेल हे सांगणे कठीण आहे अशातच पुणे जिल्ह्यातील बेल्हे शहरांचे शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ तुकाराम चाटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असल्याने एकच खळबळ उडाली आहे.

एकनाथ चाटे यांच्यावर झालेला हा हल्ला नेमका का झाला याचा शोध पोलीसांकडून घेण्यात येत आहेत. आळेफाटा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एकनाथ चाटे यांचे चुलत भाऊ साहेबराव धनंजय चाटे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एकनाथ चाटे हे आळे फाटा येथून बेल्हे येथील आपल्या घरी जात होते. यावेळी साहेबराव चाटे यांनी त्यांचा पाठलाग केला आणि अचानक त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार केले. यावेळी एकनाथ हे खाली पडले. दरम्यान, त्यांना आणखी दोन व्यक्ती हातात लोखंडी रॉड घेऊन उभे असल्याचे दिसले.

एकनाथ चाटे डोक्यात वार झाल्याने गंभीर जखमी होऊन खालीच पडले आणि जागेवरच बेशुद्ध झाले. त्यानंतर त्यांना आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Previous articleखळबळजनक :- ताडोबा अभयारण्यात वाघिणीने घेतला महिला वनरक्षकाचा बळी.
Next articleकृषी संदेश :- सेंद्रिय शेती अभावी देशातील जनतेचे आरोग्य धोक्यात!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here