Home वरोरा दिवाळी विशेष :- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केले मंडपातच लक्ष्मीपूजन?

दिवाळी विशेष :- रस्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी केले मंडपातच लक्ष्मीपूजन?

 

वेकोलीच्या कोळसा वाहतूक गाड्यांनी वनौजा नायदेव मोहबाळा रस्त्यांची केली दैना.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील एकोणा खुली कोळसा खान सुरू असून त्या कोळसा खानीतुन वेकोली च्या कोळसा वाहतूक गाड्यांनी वनौजा, नायदेव व मोहबाळा या रस्त्यांची मोठी दैना केली असून या रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील पीक घरी आणायचे कसे हा गंभीर प्रश्न या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना पडला असल्याने त्यांनी वेकोली प्रशासनाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून ठिय्या साखळी आंदोलन सुरू केले दरम्यान दिवाळीचा दिवस असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी या क्षेत्रातले लोकप्रतिनिधी किंव्हा कुठलेही राजकीय नेते मंडळी समोर आले नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या मुलाबाळांनासह आंदोलनाच्या मंडपात लक्ष्मी पूजन करून दिवाळी साजरी केल्याची घटना घडली आहे.

वनौजा, नायदेव व मोहबाळा या रस्त्यांची पूर्णतः वाट लावल्यानंतर सुद्धा वेकोली प्रशासन या रस्त्यांची दुरुस्ती करत नाही उलट याच मार्गाने ऐकोना कोळसा खानीतील कोळसा वाहतूक याच मार्गाने नेणे सुरू असल्याने गावकरी व शेतकऱ्यांनी कंपनी प्रशासन जोपर्यंत हा रस्ता दुरुस्त करून देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही ही भूमिका घेतली आणि आजचा दिवस महालक्ष्मी पूजन असल्याने आंदोलक शेतकरी यांनी या आंदोलन मंडपातच लक्ष्मी पूजन करून वेकोली प्रशासनाचा तीव्र विरोध केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here