जुना फोटो शेअर करून म्हणाले जिंदगी के साथ भी,और जिंदगी केबाद भी.
न्यूज नेटवर्क :-
पक्ष स्थापनेपासून तर आतापर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत कुणी राजनिष्ठ असेल तर त्यामधे सर्वोच्य स्थानी आजच्या घडीला आहेत ते मनसे नेते बाळा नांदगावकर. ते शिवसेनेत विद्यमान आमदार असताना राजसाहेब ठाकरे शिवसेना सोडून स्वताचा पक्ष स्थापन केला त्यावेळी राजसाहेबांसोबत गेले. दरम्यान त्यावेळी त्यानी शिवसेनाप्रमुखांना भेटून बोलले की “साहेब आपल्याकडे एवढे नेते आहेत, सगळ काही आहे पण राजसाहेब एकटे पडले आहे त्यांच्या सोबत मला जाण्याची परवानगी द्या” महत्वाची बाब म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर बोलण्याची कुणाची हिमत होत नाही तिथे राजसाहेब एकटे पडल्याचे शल्य बाळा नांदगावकर याना झाले होते व त्यानी राजसाहेबांच्या प्रेमापोटी चक्क शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मंजुरी घेऊन त्यांच्या पाठीशी ते उभे राहिले नव्हे आजही ते तसेच निष्ठावंत व कायम सोबतीला आहे.आज जिथे पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाणारे नेते कुठे आणि महाराष्ट्रात पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार कार्याचा भार एकट्या राज साहेबावर पडतो म्हणून स्वता उमेदवार म्हणून उभे न राहता आपल्या जागेवर दुसऱ्यां उमेदवाराला लढविणारे बाळा नांदगावकर कुठे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यानी फेसबुक वर एक राज साहेबांसोबतचा फोटो टाकून त्या पोस्टवर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की “जीवनात अनेक लोक येतात, परंतु कायमस्वरूपी मनावर राज्य करणारे मिळणे म्हणजे सौभाग्यच. राजसाहेबांच स्थान हे असेच माझ्या वाटचालीत तसेच मला कायमच प्रेम, मार्गदर्शन लाभले. मी सुद्धा यथाशक्ती माझी निष्ठा, माझे प्रेम सर्वस्व साहेबांना अर्पण केले.
ते पुढे म्हणाले की साहेबांप्रती माझे हे प्रेम, ही निष्ठा ही कायमच आहे व राहील. तसेच जन्मोजन्मी साहेबांची अशीच सोबत राहो हीच सदिच्छा. कारण काही नाते हे एका आयुष्यापुरते नसून जन्मोजन्मी चे असतात ते म्हणतात ना? “जिंदगी के साथ भी , जिंदगी के बाद भी” अगदी तसंच.