Home भद्रावती धक्कादायक :- वाढदिवसाचे निमित्त पुढे करुन शासकीय आरोग्य शिबिर चोरण्याचा नगराध्यक्ष अनिल...

धक्कादायक :- वाढदिवसाचे निमित्त पुढे करुन शासकीय आरोग्य शिबिर चोरण्याचा नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांचा प्रयत्न?

 

भद्रावती शहरातील सुज्ञ जनतेचा या आरोग्य शिबिरावर कटाक्ष. जनतेची दिशाभूल करून राजकीय फायदा घेण्याचे कारस्थान?

चंद्रपुर विशेष प्रतिनिधी :-

राजकारणात जनतेसमोर विकास पुरुष व समाजसेवक असल्याचा देखावा करण्याची अनेकांना जणू सवय जडली आहे. शासनाच्या पैशातून झालेला विकास सुद्धा जणू लोकप्रतिनिधी यानी आपल्या जवळच्या पैशातून केल्याचा देखावा अनेकदा अनेक पक्षातील नेते व लोकप्रतिनिधी करतात हे जरी खर असल तरी शासनाचे आरोग्य शिबिरच स्वताच्या वाढदिवशी घेण्याचा दुर्मिळ प्रकार भद्रावती शहरात घडत असून स्वता नगराध्यक्ष अनिल धानोरकर यानी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय व भद्रावती ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिरांचे शासकीय आयोजन असताना स्वताच्या वाढदिवशी घेत असल्याचे पत्रक भद्रावती शहरात वाटले असल्याची धक्कादायक राजकीय वार्ता असून शहरात याबद्दल प्रचंड असंतोष दिसत आहे.

खर तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपुर व ग्रामीण रुग्णालय, भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वैद्यकिय व दंत आरोग्य शिबिराचे आयोजन दि. १०, ११ व १२ नोव्हेंबरला भद्रावती शहरातील राजवंदन सभागृह, भाजी मार्केट येथे करण्यात आले आहे. सदर तीन दिवसीय शिबिर हे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत पुर्णत: शासकीय खर्चातून असुन सर्व जनतेसाठी खुले आहे. याबाबतचे पत्रक काढून तालुका वैद्यकीय यानी प्रशासन स्तरावर याबाबतचा प्रसार व प्रचार केलेला आहे.

गोरगरीब जनतेला आरोग्य सेवा देणे हे एक पवित्र कार्य आहे, पण शासनाच्या पैशातून होत असलेल्या आरोग्य शिबिराचे श्रेय स्वताच्या वाढदिवशी नगराध्यक्ष सारख्या व्यक्तींनी घ्यावे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या भावनेशी हा खेळ आहे. जर आपला वाढदिवस भव्य दिव्य करायचा असेल तर जनतेच्या स्मरणात राहील असे आगळेवेगळे उपक्रम नगराध्यक्षांने राबवायला हवे पण शासकीय शिबिर चोरून ते स्वताच्या नावावर राबवील्याचा जो पराक्रम सद्ध्या दिसत आहे तो राजकीय परिपक्वता नसल्याचे संकेत आहे ते नगराध्यक्ष सारख्या जबाबदार व्यक्तींनी दाखवू नये कारण ही जनता आहे, सगळे काही बघत असते आणि ती ठरवत पण असते, याबाबत भद्रावती शहरातील सुज्ञ नागरिकांनी कटाक्ष करत नगराध्यक्ष यांच्यातर्फे जाहीर पत्रकांचा निषेध करून हे आरोग्य शिबिर स्वताच्या नावाने असल्याचे दाखवल्याने जनतेची दिशाभूल करणाऱ्या व राजकीय फायदा घेणाऱ्या नगराध्यक्ष धानोरकर यांच्यावर सामाजिक माध्यमावरून निशाणा साधला आहे.महत्वाची बाब म्हणजे राजकीय संधी मिळाल्याचा गैरफायदा कुणी घेऊ नये एवढी इच्छा आणि आकांक्षा भद्रावती शहरातील जनतेची आहे, मात्र त्यांच्या कसोटीला शहराचे प्रथम नागरिक व नगराध्यक्ष म्हणून अनिल धानोरकर यानी खरे उतरायला हवे मात्र त्यांचा शिबिरच स्वताच्या नावे करण्याचा जो अट्टाहास त्यानी चालवलेला आहे तो त्यांच्या राजकीय स्वास्थ्याला परवडणारा नाही एवढे मात्र खरे.

Previous articleमनसे नेते बाळा नांदगावकर यानी राजनिष्ठेचा दिला असा पुरावा.
Next articleपोलिस पंचनामा :- अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here