Home चंद्रपूर पोलिस पंचनामा :- अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड,

पोलिस पंचनामा :- अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात जुगार अड्डयावर धाड,

 

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पडलेल्या या धाडीत ठाणेदार यांच्यावर कुलकर्णी यांचा संताप?

चंद्रपूर प्रतिनिधी :-

जिल्ह्यात अवैध व्यवसाय आता दारूबंदी उठल्याने मेटाकुटीला आले असले तरी अवैध दारूविक्रीला पर्याय म्हणून अवैध जुगार, सट्टापट्टी अवैध सुगंधित तंबाखू विक्री, वाळू विक्री आणि कोळसा विक्री ठरत आहे. मात्र हे सगळे धंदे स्थानिक पोलिस प्रशासनाच्या आणि संबंधित विभागातील अधिकाऱ्यांच्या हप्ता खोरीमूळे होत असते हे सर्वश्रुत आहे.अशातच काल रात्रीला बाबुपेठ येथील बाबानगर येथे शहर पोलिस स्टेशन च्या काही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हा लाखो रुपयाचा जुगार भरला जातो अशी माहिती ही अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी याना मिळाली आणि त्यानी अत्यंत गोपनीयता पाळून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या साह्याने जुगार अड्ड्यावर धाड टाकून रोख रकमेसह जवळपास एकूण 36 लक्ष 57 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या जुगार अड्ड्यावर सापडलेले आरोपी हे अट्टल जुगारी होते अशी माहिती असून ते स्थानिक शहर पोलिस स्टेशनच्या काही अधिकाऱ्यांचे हात ओले करायचे आणि त्यामुळेच हा जुगार चालत होता अशी चर्चा आहे, दरम्यान एक हप्त्यापुर्वी यापैकी काही जुगारी यांच्यावर गुन्हे दाखल झाले असल्याचे पण समजते.

अप्पर अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना चंद्रपूर-बल्लारपूर रोडलगत बाबानगर येथे रात्रीच्या सुमारास काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्याआधारे अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी गुन्हे शाखेच्या पथकाद्वारे बाबानगर येथील राजेश गुप्ता नावाच्या इसमाच्या घरावर धाड टाकली.आणि मुद्देमालासह आरोपींना अटक केली आणि शहर पोलिस स्टेशन मधे त्यांच्या विरोधात जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. या अवैधरित्या चालणाऱ्या धंद्याला पाठबळ करणाऱ्या पोलिसांवर अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी  यानी चांगलीच आगपाखड केली असल्याची चर्चा आहे, मात्र त्यांच्यावर अप्पर अधीक्षक कारवाई करणार काय? हा प्रश्न अतिशय गंभीर असून शहर पोलिस स्टेशन चे ठाणेदार आंबोरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांना ते काम चुकारपणा व अवैध धंदेवाईक याना पाठीशी घालत असल्याचा ठपका ठेऊन काय काय कारवाई करतात हे पाहणे औस्तूक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here