Home वरोरा खळबळजनक :- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी बुडविल्या लाखो रुपयाच्या ठेवी.

खळबळजनक :- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी बुडविल्या लाखो रुपयाच्या ठेवी.

 

जवळपास 135 ठेवीदारांच्या हक्कासाठी अँड अमोल बावणे यांच्या नेत्रूत्वात तहसीलदार यांच्याकडे तक्रार.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा येथील श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे
अध्यक्ष-विठ्ठल तवाडे, सचिव-महेश केदार व इतर संचालकांनी जवळपास 135 ठेवीदारांच्या ठेवी बचतीची मुद्दत भरल्यानंतर सुद्धा परत केल्या नसल्याने अँड अमोल बावणे यांच्या नेत्रूत्वात ठेवीदारांनी संस्थेचे पदाधिकारी व संचालक यांच्या विरोधात तहसीलदार मैडम व सहाय्यक तालुका निबंधक यांच्याकडे तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केल्याने संचालक मंडळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्री सिद्धिविनायक नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष सचिव इतर संचालक व कर्मचारी यांनी भागधारक (ग्राहक ) ठेवीदारांची जवळपास २० ते २५ लाख ठेवी रक्कम देण्यास टाळाटाळ चालवली आहे. या संदर्भात ठेवीदारांनी संस्थेच्या अध्यक्ष सचिव यांच्याकडे अनेक वेळा येरझाऱ्या मारल्यानंतर ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत आल्यामुळे त्यांच्यावर आता फौजदारी कार्यवाही करण्यात येऊन त्या सर्वाना अटक करावी अशी मागणी ठेवीदारांनी तहसीलदार व तालुका सहाय्यक निबंधक याना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

वरोरा येथील नेहरू चौक येथे कार्यरत श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेत जे मुख्य ठेवीदार ग्राहक आहे यांच्यासह जवळपास 135 ठेवीदारांची जवळपास २० ते २५ लाख रुपये ठेवी म्हणून ठेवले मात्र मुदत भरल्यानंतर सुद्धा त्याना त्यांची रक्कम मिळाली नाही. सदर पतसंस्था ही अध्यक्ष व इतर संचालक यांनी भ्रष्टाचार करून दिवाळखोरीत काढल्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी ते देत नव्हते त्यामुळे सहायक निबंधक सहकारी संस्था तालुका वरोरा यांचे कार्यालयात ग्राहकानी दिनांक १५/०७/२०२१ व १७/०७/२०२१ रोजी पतसंस्थेच्या विरुद्ध तक्रार केली असता सदर कार्यालय हे अध्यक्ष व संचालकांचा भ्रष्टाचार लपविण्या करिता ठेवीदारांना भूलथापा देत असल्याने त्या सर्व ठेवीदारांनी अँड अमोल बावणे यांच्याकडे सदर प्रकरण नेले व त्यांच्या नेत्रूत्वात वरिष्ठांना तक्रारी देऊन संस्थेच्या अध्यक्ष व संचालकांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी अन्यथा सर्व ठेवीदार तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल असा इशारा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here