Home वरोरा ब्रेकिंग न्यूज :- वरोरा तालुक्यातील भटाळा येथील 70 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला.

ब्रेकिंग न्यूज :- वरोरा तालुक्यातील भटाळा येथील 70 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला.

 

गंभीर जखमी अवस्थेत प्राथमिक उपचारासाठी वरोरा उपजिल्हा रुग्णालयात केले दाखल.

वरोरा ता.प्रतिनिधी(किशोर डुकरे):-

वरोरा तालुक्यातील भटाळा येथील शेतकरी नामदेव कटू गराडे हे आपल्या शेतात आज दिनांक 10 नवेंबर ला दुपारी कापूस वेचत असताना दडी मारून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला व त्यांच्या आवाजाने त्या शेतात असणाऱ्या शेतकरी व महिलांच्या आरडा ओरडा बघून वाघाने तिथून पळ काढला.यामधे माणिक मारोती जांभुळे,प्रभाकर नामदेव मगरे आणि मैनाबाई माणिक जांभुळे यांनी वेळेवर वाघाला हूसकून लावल्याने मोठा अनर्थ टळला मात्र उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे गंभीर अवस्थेत असणाऱ्या नामदेव गराडे यांची प्रक्रुती चिंताजनक असल्याने भटाळा येथील गावकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.

भटाळा व आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी अगोदरच वाघाच्या दहशती मधे आहे व मागील तीन दिवसापूर्वी याच परिसरात वाघ विहिरीत पडला होता अशातच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी या परिसरातील वाघावर प्रतिबंध लावला नसल्याने आता चक्क वाघाचा हल्ला शेतकऱयांवर झाल्याने या परिसरातील गावकऱ्यांनी संताप व्यक्त करून वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा वन विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleखळबळजनक :- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांनी बुडविल्या लाखो रुपयाच्या ठेवी.
Next articleक्राईम रिपोर्ट :- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here