Home वरोरा क्राईम रिपोर्ट :- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

क्राईम रिपोर्ट :- श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हे दाखल होणार?

 

स्वताला प्रतिष्ठित म्हणविणाऱ्या संचालकांवर  पोलिस कारवाईची टांगती तलवार? अँड अमोल बावणे करणार पैरवी.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यात श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे लाखो रुपयाचे भ्रष्टाचाराचे प्रकरण सद्ध्या गाजत असून त्या संस्थेत ठेवी ठेवणाऱ्या ठेवीदारांच्या ठेवी मूद्दत संपल्यानंतर सुद्धा मिळाल्या नसल्याने हे प्रकरण अँड अमोल बावणे यांच्या नेत्रूत्वात तहसीलदार, तालुका सहाय्यक निबंधक व्हाया पोलिस प्रशासनाकडे गेल्याने या प्रकरणात संचालकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता असल्याने आता सर्व संचालकांवर कारवाई चा बडगा उठणार असल्याची चिन्हे दिसत आहे.

संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल तवाडे, सचिव महेश केदार व इतर संचालकांनी जवळपास 135 पेक्षा जास्त ठेवीदारांच्या ठेवी बचतीची मुद्दत भरल्यानंतर सुद्धा परत केल्या नाही दरम्यान काही ठेवीदारांनी संस्थेच्या संचालकांविरोधात तहसीलदार मैडम व सहाय्यक तालुका निबंधक यांच्याकडे तक्रार देऊन कारवाई करण्याची मागणी केल्याने व या संस्थेत शहरातील नामी लोकांचा सहभाग असल्याने आता या संस्थेच्या सर्व संचालक मंडळावर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहे.आता ते संचालक कोण? हे येणाऱ्या काही दिवसात समोर येणार असून हे प्रकरण कुठले वळण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

वरोरा येथील नेहरू चौक परिसरात मागील अनेक वर्षापासून श्री सिद्धिविनायक नागरी सहकारी पतसंस्थेचे कार्यालय सुरू होते आणि त्या संस्थेत वरोरा शहर व तालुक्यातील शेकडो ग्राहकांच्या दैनंदिन,आठवडी व मासिक यासह फिक्स डिपॉझिट पण होते पण मूद्दत ठरलेल्या मुदतीत पैसे परत करण्याची वेळ आली तेंव्हा संस्थेने हात वरती केल्याने ठेवीदारांना मोठा झटका बसला व ते अँड अमोल बावणे यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या नेत्रूत्वात जे मुख्य ठेवीदार ग्राहक आहे संबंधित विभागाला तक्रारी देऊन ठेवीदारांच्या ठेवी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या संचालकांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असल्याने आता सर्व संचालकांवर कारवाई ची टांगती तलवार लटकलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here