हिंदूयुवा संघटना अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक यांचा अनोखी भाऊबीज भेट.
वरोरा प्रतिनिधी :-
वाढलेली महागाई आणि हाताला काम नाही त्यामुळे गरिबांच्या घरी दिवाळी साजरी होणे अवघड होऊन बसले असताना गरीब भाऊ आपल्या गरीब बहिणीला साडी घेणार ते कसे?हा यक्ष प्रश्न लक्षात घेऊन समाजसेवेत अग्रेसर असे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना पाठक व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाऊबीजेचे औचित्य साधून गोरगरीब महिला भगीनीना साडी, मिठाई व त्यांच्या पतीना शर्ट व घोंगडी वाटप करून एक जगावेगळा उपक्रम राबवला.
वरोरा शहर हिंदू युवा संघटना शहर अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ता मुन्ना कुमार पाठक यांनी भाऊबीज निमित्त गोरगरीबांचे भाऊ बनून साडी, शर्ट, मीठाई घोंगडीचे वाटप भटकणाऱ्या गौर गरीबांना व सोनुबाई येवले (अहिल्याबाई होळकर ) वृंदाश्रम येथे देऊन मदतीचा हात दिला जो कौतुकास्पद असून हिंदू युवा संघटना अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते मुन्ना कुमार पाठक, कुणाल पीदुलकर, साहिल वाभिटकर, विनित देठे , शुभम चोपने ,धवल पटेल , अँड रोशन नकवे हेमंत डफ श्रीधर पनके ,रितीक ढोक अनुप सरोदे , तुषार संचेती, आदित्य पाठक निहाल धोटे, सुनील नकवे इत्यादींचे सर्वत्र कौतुक होत आहे.