Home वरोरा उपविभागीय अधिकारी यांच्याकडून उपोषणकर्त्याना अपमानास्पद वागणूक व दमदाटी?

उपविभागीय अधिकारी यांच्याकडून उपोषणकर्त्याना अपमानास्पद वागणूक व दमदाटी?

 

ग्रामपंचायत मोहबाळा कडून आंदोलनकर्त्याचा सभेवर बहिष्कार असल्याचे एसडिओना पत्र.

वरोरा प्रतिनिधी :-

वरोरा तालुक्यातील एकोणा खुली कोळसा खान प्रकल्पातून कोळशाची जड वाहतूक वनौजा, नायदेव व मोहबाळा या रस्त्यांने होत आहे,पण त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा रस्ता उखडला व मोठमोठे खड्डे पडले शिवाय शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे वाहतूक करणाऱ्या गाड्याच्या प्रदूषणाने मोठे नुकसान होत आहे, परंतु मागील वर्षभरापासून वेकोली किव्हा वर्धा पॉवर कंपनी ने रस्ता तर बनवला नाहीच शिवाय शेतकऱ्याना नुकसान भरपाई सुद्धा दिली नाही,त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी कोळसा वाहतूक होणाऱ्या नायदेव च्या रस्त्यावर साखळी उपोषण सुरू केले असून या परिसरातून कोळसा वाहतूक करणाऱ्या गाड्यावर प्रतिबंध लावला आहे.

वर्धा पॉवर कंपनी मधे कोळशाचा पुरवठा झाला नाही तर ती कंपनी बंद होऊ शकते त्यामुळे प्रशासनाला मध्यस्थी करून हे आंदोलन दडपण्यासाठी वर्धा पॉवर कंपनी व वेकोली कंपनी रणनीती खेळून उपविभागीय अधिकारी शिंदे याना समोर केले आहे.दरम्यान साखळी उपोषण करणाऱ्या आंदोलनकर्त्याना चक्क उपविभागीय अधिकारी शिंदे यानी अपमानास्पद वागणूक देऊन दमदाटी केल्याचा खळबळजनक आरोप आंदोलनकर्त्याने केला आहे. उपविभागीय अधिकारी शिंदे यानी वर्धा पॉवर व वेकोलीच्या अधिकाऱ्यासोबत आज दिनांक 11 नोव्हेंबर ला सभा आयोजित केली होती पण या सभेत उपविभागीय अधिकारी यांचा पूर्व इतिहास बघता पुन्हा आपल्याला ते अपमानास्पद वागणूक देऊन आपल्यावर उपोषण मागे घेण्याचा दबाव टाकेल त्यामुळे गावकऱ्यांनी मिळून सरपंच मोहबाळा यांच्या स्वाक्षरीने उपविभागीय अधिकारी यानी आयोजित केलेल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याबाबत पत्र देण्यात आले आहे. पण या प्रकरणात प्रशासन गावकऱ्यांकडून आहे की वर्धा पॉवर कंपनी व वेकोलीकडून? याबाबत आता शंका वाटायला लागली आहे.

मागील वर्षापासून कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषणाने नुकसान झालेल्या शेतपिकांची शेतकऱ्याना नुकसान भरपाई दिली नाही व या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेकांचे अपघात या ठिकाणी झाले. या रस्त्यावरून शेतकऱ्यांच्या शेतातील पीक घरी आणायचे कसे व शेतात बैलबंडी न्यायची कशी ? हा गंभीर प्रश्न या तिन्ही गावातील शेतकऱ्यांना पडला असल्याने त्यांनी वेकोली प्रशासनाविरुद्ध बंडाचा झेंडा उभारून ठिय्या साखळी आंदोलन सुरू केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here