खळबळजनक :-समोर बिबट्या आल्याने गाडीवर चे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात. पोलिस उपनिरीक्षक अविनाश पडोळे यांचा म्रुत्यु चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावर दुचाकीपुढे अचानक बिबट्या आल्याने भीषण अपघात झाला या अपघातात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अविनाश पडोळे असे मृत्यू झालेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तोपर्यंत अविनाश पडोळे यांचा मृत्यू झाला होता.
मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक अविनाश पडोळे आज दुपारी 12 वाजता बल्लारपूर येथून शहरात दुचाकीने येत होते. यावेळी चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरुन जात असताना त्यांच्यासमोर एक बिबट्या आला. वळणावर बिबट्या रस्ता ओलांडत असल्यामुळे वेगात येत असलेल्या पडोळे यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून अपघात घडला, परिणामी अधिक रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला
अविनाश पडोळे हे चंद्रपूरच्या पोलीस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश वहन विभागात कार्यरत होते. या अपघाताची घटना घडल्यानंतर पोलिसांनी पथक पाठवून अधिक तपास सुरु केला आहे. मात्र अचानक पडोळे यांचा मृत्यू झाल्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची अकाली एक्झिट झाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.