Home चंद्रपूर चिंताजनक :-चंद्रपूर जिल्ह्यात ओमीक्रोनच्या लाटेत हे चाललंय तरी काय?

चिंताजनक :-चंद्रपूर जिल्ह्यात ओमीक्रोनच्या लाटेत हे चाललंय तरी काय?

 

वरोरा येथे कबड्डी तर चंद्रपूर मधे सीपीएल आयोजनाची परवानगी का?

लक्षवेधी :-

जिल्ह्यात दारूबंदी उठली आणि जणू सगळीकडे आनंदी आनंद साजरा व्हायला लागला की काय अशीच एकूण परिस्थिती दिसायला लागली. एरव्ही अवैध दारूविक्रीच्या माध्यमांतून चांगभलं करून घेतलेल्यानी आता सुगंधित तंबाखू व कोळसा चोरी रेती चोरी मधे आपली माणसे शीरवली आणि त्यातून मिळविलेल्या पैशातून मौजमजा चालवली असल्याचे चित्र आता दिसायला लागले आहे. कारण एकीकडे कोरोना चा नवा व्हेरीएंट ओमीक्रोन राज्यात आणि राज्यातील जिल्ह्यात शिरायला लागला तरीही जिल्ह्यात आमदार कबड्डी चषक सामने हजारोंच्या गर्दीत होतात, तेही रात्रीच्या दीड वाजेपर्यंत पोलिसांच्या उपस्थितीत डीजे वर जल्लोष केल्या जातो पण पोलीस कारवाई करत नाही तर दुसरीकडे  चंद्रपूर शहरात सीपीएल क्रिकेट सामने भरवले जातात व हजारोची भीड गोळा केली जाते पण तरीही कारवाई नाही विशेष म्हणजे यांच्या आयोजनाला जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कडून परवानगी मिळतेच कशी? याचे आश्चर्य वाटतेय. कारण त्यांना शासनाचे आदेश असतांना असल्या कार्यक्रमाचे आयोजन ते कुठल्या नियमाने होऊ देत आहे हा अतिशय गंभीर प्रश्न असून जर चांदा क्लब ग्राउंड वर चाललेल्या आनंद मेला संचालकांवर चंद्रपूर महानगर पालिका 50 हजाराचा दंड थोपटते तर मग वरोरा येथील दीड वाजेपर्यंत चाललेल्या कार्यक्रम व चंद्रपूर शहरात चाललेल्या सीपीएल क्रिकेट सामना आयोजकांवर दंड आणि त्यांच्यावर कारवाई का नाही ?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी कोरोना ची दुसरी लॉट सर्वसामान्य माणसाच्या मानगुटीवर बसली होती व ऑक्सिजन बेड मिळत नव्हते, व्हेंटिलेटर मिळत नव्हते एवढेच काय तर रेमडिसिव्हर इंजेक्शन मिळत नव्हते, जणू आरोग्याचा प्रश्न रामभरोसे होता तेंव्हा हे आयोजन करणारे नेमके कुठल्या बिळात होते माहीत नाही, म्हणजे जेव्हा जनता दुःखी होती संकटात होती तेंव्हा यांच्याकडून जनतेच्या आरोग्यावर जर काही खर्च झाला असता तर किमान काही रुग्णांचे प्राण वाचले असते व  या आयोजनावर जो खर्च होताहेत त्या पैशाएवढा पैसा तेंव्हा खर्च केला असता तर  काही रुग्णांना दिलासा मिळाला असता पण आता थोडी का कोरोना पासून सूट मिळाली तर गर्दी होणारे मोठे आयोजन करून ते नेमका काय संदेश जनतेला देताहेत हेच कळत नाही, महत्वाची बाब म्हणजे  प्रशासन म्हणून जी महत्वपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे तेच जर आयोजकांना खुली सूट देत असेल तर मग जनतेच्या आरोग्याचा प्रश्न कोण सोडवणार? याचे उत्तर जिल्हाधिकारी यांनी खरं तर देण्याची आवश्यकता आहे.

खरं लिहिलं की पत्रकारांवर गुंडा कडून होतात हल्ले आणि पोलीस  प्रशासन कारवाई करत नाही.

जिल्ह्यात सद्ध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मोठी गळचेपी होत असून राजकीय सत्ताधारी आणि लोकप्रतिनिधी यांनी काहीही केले तरी विरोधात लिहायचे नाही म्हणजे खरी बातमी द्यायची नाही हा जणू शिष्टाचार झाला आहे आणि कुणी पत्रकार हा शिष्टाचार तोडायला तयार नाही पण जे जनसेवेचा ध्यास घेतलेले पत्रकार आहेत ते सत्त्य सातत्याने जनतेसमोर मांडतात त्यांच्यावर मग पोसलेल्या गुंडा कडून हल्ले करून त्यांना दहशती मधे ठेवले जातात या संदर्भात भूमिपूत्राची हाक चे संपादक राजू कुकडे यांच्यावर गुंडा कडून हल्ला झाला पण त्याची चौकशीच झाली नाही तर मग पोलीस प्रशासन नेमके कुणासाठी काम करताहेत? हे समोर यायला हवे. कारण एका साठी एक नियम आणि दुसऱ्या साठी दुसरा नियम यालाच लोकशाही म्हणायची का? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडायला लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here