Home चंद्रपूर धक्कादायक :- पोंभुर्णातील नराधमांनी एका १४ वर्षीय मुलीचा आळीपाळीने केला लैंगिक अत्याचार.

धक्कादायक :- पोंभुर्णातील नराधमांनी एका १४ वर्षीय मुलीचा आळीपाळीने केला लैंगिक अत्याचार.

 

समाजमन सुन्न करणाऱ्या या घटनेच्या विरोधात ऑल इंडिया पैँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रूपेश निमसरकर यांनी घेतला पुढाकार.

पिडीतेचं पुनर्वसन करून एक करोडची तात्काळ मदत देण्याची केली मागणी.

चंद्रपूर प्रतिनिधी -:

महाराष्ट्र शासनाने बेटी बचाव बेटी पढाओ नारा लावून संविधानीक तरतुदी केल्या आहेत. व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम २०१८ अंतर्गत बालकांसाठी मोठी तरतूद केली आहे. त्याही नंतर महाराष्ट्राचे महिला धोरण, राष्ट्रीय महिला धोरण मसुदा २०१६ , राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००१, बलात्कार पिडीत, लैंगिक शोषण पिडीत, बालक आणि हल्ला, पिडीताकरीता मनोधैर्य योजनेची अमलबजावणी करणे व इतरही धोरणे आहेत. परंतु पोंभुर्णा तालुक्यात ग्रामीण भागात घडलेल्या या समाजसुन्न करणाऱ्या घटनेत त्यांच्या कुंटुबाची मोठी हानी झाली असून मानसिक खच्चीकरण झाले आहे. त्यामुळे या धोरणांच्या माध्यमातून पोंभुर्णा तालुक्यातील पिडीत १४ वर्षीय बालीकेवर घडलेल्या अत्यारात तिचे पुनर्वसन तात्काळ करुन एक करोड ची आर्थिक मदत कुंटुबीयांना जाहीर करुन पिडीत व कुटुबांचे मनोबल वाढवावे अन्यथा ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील महिलांवरील होणाऱ्या अन्याय अत्याचार व पोलीसांच्या कर्तव्यशुन्य कारभारा विरोधात आंदोलन करण्यात येईल असा इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी दिला आहे.

जिल्ह्यातील आदिवासी बहुल, मागास क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यात मागील काही दिवसात महिलावर अन्याय, अत्याचारच्या घटना अनेक घडत आहेत. मात्र पोंभुर्णा पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही त्यामुळेच अल्पवयीन 14 वर्षाच्या मुलीवर आळिपाळीने लैंगिक शोषणची घटना घडली आहे असा आरोप रूपेश निमसरकर यांनी केला आहे.

समाजमन सुन्न करणारी ही घटना खरे तर राजकीय सामाजिक द्रुष्टीने अतिशय भयावह असताना इथले पालकमंत्री, आमदार, खासदार या घटनेची साधी दखल घेत नाही. पिडीते संबधी वा तिच्या पुढील भविष्याकरीता न्याय मिळावा म्हणून पुढे येत नाही. या गंभीर प्रकणात तोंडाला झाकन लाउन बसलेल्या कांग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, सत्ताधारी पक्षात असलेल्या महिला संघटना कुठे लपल्यात असा घणाघात सवाल ऑल इंडिया पँथर सेनेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार यांनी प्रसिद्धी माध्यमातून केला असून पिडीतेचं पुनर्वसन करुन तात्काळ एक करोड रुपायाची आर्थिक मदत त्यांच्या कुटुबीयांना द्यावी अशी मागणी या त्यांनी करून त्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची सजा मिळावी यासाठी सज्जड पुरावे पोलिसांनी गोळा करावे अशी मागणी पण त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here